The Kerala Story rowKangana Ranaut reacts to The Kerala Story row Esakal
मनोरंजन

The Kerala Story row:'केरळ स्टोरीला विरोध करणारे दहशतवादी' वादात कंगना संतापली

Vaishali Patil

Kangana Ranaut reacts to The Kerala Story row: अभिनेत्री अदा शर्मा स्टारर आणि सुदिप्तो सेन दिग्दर्शित 'द केरल स्टोरी' सिनेमा सध्या जोरदार चर्चेत आहे. हा सिनेमा काल 5 मे ला सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. मात्र या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून वादाला सुरुवात झाली. आता चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर राजकिय वातावरण देखील चांगलच तापलं होतं. अनेकांनी या चित्रपटाला विवादित आणि प्रोपगंडा पसरवणारा चित्रपट म्हटलं तर काहींनी मुलींच्या संख्येवरुन जोरदार गोंधळ घातला.

चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांच्या या चित्रपटाला समिंश्र प्रतिसाद मिळाला. काहींनी पाठिंबाही दिला आहे. खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या चित्रपटात कौतुक करत कॉंग्रेसवर निशाणा साधला आहे. आता त्यातच बॉलिवूडची पंगा क्वीन कंगना राणौत हिने देखील या चित्रपटावर भाष्य केलं आहे.

एका चॅनेला दिलेल्या मुलाखतीत कंगना म्हणाली, "बघा मी चित्रपट पाहिला नाही पण चित्रपटावर बंदी घालण्याचा खूप प्रयत्न करण्यात आला आहे. मी आज वाचलं आहे, मी चुकत असेल तर मला दुरुस्त करा, उच्च न्यायालयाने म्हटलं आहे की या चित्रपट बंदी घातली जाऊ शकत नाही. मला असं वाटतं की ते कोणालाही वाईट दाखवता नाही आहेत. तर ते फक्त ISIS दाखवत आहे. जर उच्च न्यायालय, देशाची सर्वात जबाबदार संस्था असं म्हणत असेल तर ते बरोबर आहेत. ISIS ही एक दहशतवादी संघटना आहे."

“जर तुम्हाला वाटत असेल की ती दहशतवादी संघटना नाही,तर तुम्ही देखील दहशतवादी आहात. जर तुम्हाला वाटत असेल की एखादी दहशतवादी संघटना दहशतवादी नाही, आणि ती कायदेशीर, नैतिकदृष्ट्या प्रत्येक मानकांनुसार तिला दहशतवादी घोषित केली गेली आहे. जर तुम्हाला वाटत असेल की ती दहशतवादी संघटना नाही तर तुम्ही देखील दहशतवादी आहात,” हे गणित खुप सोप आहे.

तर दुसरीकडे चित्रपटाच्या कमाईच्या आकडेवारीवर नजर टाकली असता या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ‘द केरला स्टोरी’ ने ७.५ कोटी कमावले आहेत. विशेष म्हणजे वीकएंड मध्ये हा चित्रपट अजून जोरदार कमाई करेल असा अंदाज अनेकांनी वर्तवला आहे. त्यामुळे प्रेक्षकांनीही हा चित्रपट पाहण्यास पसंती दर्शवली असल्याच दिसत आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance : आरोग्य विम्यावर ‘जीएसटी’चा भार; सर्वसामान्यांचे बिघडतेय आर्थिक गणित

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रावर अतिमुसळधार पावसाचे संकट, पुढील 24 तास महत्वाचे; हवामान विभागाचा हाय अलर्ट

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : महाराष्ट्रापुढील सर्व संकटे दूर करण्याची शक्ती पांडुरंगाने द्यावी- देवेंद्र फडणवीस

Beed News: परळीतील गोळीबार खून प्रकरणात न्यायालयाचा मोठा निर्णय ,आरोपींना मिळणार नाही जामीन!

Ashadhi Ekadashi 2025 Special Recipe: आषाढी एकादशीनिमित्त उपवासाला बनवा खास अन् स्वादिष्ट पॅटिस, सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT