Kangana Ranaut reviews Sita Ramam, calls it epic love story; praises Mrunal Thakur: ‘Truly a queen’  sakal
मनोरंजन

सूर्य कुठं उगवला! चक्क कंगनानं केलं या अभिनेत्रीचं कौतुक..

नेहमी लोकांवर टीका करणारी अभिनेत्री कंगना राणौत जेव्हा कौतुक करते तेव्हा सर्वांनाच धक्का बसतो.

सकाळ डिजिटल टीम

kangana ranaut : आपल्या बिनधास्त आणि परखड वक्तव्यामुळे कायम चर्चेत असणारी कंगना राणौत ही नेहमीच नेपोटिजम किंवा राजकारण याविषयी भाष्य करते. त्यामुळे कंगना आणि वाद हे एक समीकरणच झाले आहे. कंगना टीका जरी हिरीरीने करत असली तरी कौतुक मात्र क्वचितच करत असते. तिने कौतुक करणं म्हणजे अनेकांना धक्काच बसतो. असाच धक्का नुकताच बसला आहे. कंगनाने चक्क 'सीता रामम' या चित्रपटा कौतुक केलं आहे.

(Kangana Ranaut reviews Sita Ramam, calls it epic love story; praises Mrunal Thakur: ‘Truly a queen’

)

नुकताच कंगनाने 'सीता रामम' हा चित्रपट बघितला आणि त्यानंतर चित्रपटाच्या सगळ्या टीमच कौतुक केलंय. 'सीता रामम' हा चित्रपट 5 ऑगस्टला रीलीज झालेला तेलगु चित्रपट असून त्याने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. यात साऊथ अॅक्टर दुलकर सलमान आणि मृणाल ठाकूर यांनी अभिनय केला असून यामध्ये 1964 ची LOVESTORY दाखवण्यात आली आहे.

कंगनाने याबद्दल आपल्या इंस्टावर स्टोरी टाकत सांगितले की, ''आज 'सीता रामम' पाहिला, आवर्जून सांगावं वाटेल की हा चित्रपट पहाण्याचा अनुभव खूपच आनंदायी होता. चित्रपटाचे दिग्दर्शक हनु राघवपुडी यांचेही तिने अभिनंदन. या चित्रपटातील सर्वच कलाकार भारी आहेत. त्यातही मृणाल ठाकूरचा अभिनय विशेष भावला. अत्यंत परफेक्ट कास्टिंग होतं ते. मृणालने ज्या पद्धतीने भूमिका निभावली ती क्वचितच कुणाला जमली असती,'अशा शब्दात कंगनाने कौतुक केले आहे. यावर मृणालनेही तिचे आभार मानले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: पावसाने उघड केलं विकासाचं वास्तव! मुंबईत झाडं कोसळली, रस्ते वाहून गेले, मिसिंग लिंकवर खड्ड्यांचं साम्राज्य

Pune Flyover Work Stalled: कोरेगाव मूळ रेल्वे गेट क्र. ८ वरील बहुप्रतिक्षित उड्डाणपूलाचे काम भूसंपादन मोबदला न मिळाल्याने पुन्हा ठप्प

Latest Marathi Live Update : मुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळली; वाहतूक विस्कळीत

Education Crisis: अर्धापूरात ८४ शिक्षक बीएलओ कामात अडकले; दोन-दोन वर्गांवर एकच शिक्षक, विद्यार्थ्यांच्या शिक्षणहक्कावर गदा

रविवार ठरणार खास! आयुष्मान योगामुळे 2 राशींची लागणार लॉटरी; जाणून घ्या तुमचं भविष्य

SCROLL FOR NEXT