taapsee swara on kangna 
मनोरंजन

कंगना रनौतच्या 'बी-ग्रेड' वक्तव्यावर तापसी आणि स्वराने घेतली शाळा..

दिपालीराणे-म्हात्रे

मुंबई-  बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौत सध्या घराणेशाहीच्या मुद्द्यावरुन सोशल मिडियावर चांगलीच ऍक्टीव्ह झाली आहे. इंडस्ट्रीमधील माफिया आणि त्यांच्याशी संबंधित अनेक गोष्टींचे खुलासे करताना ती दिसतेय. नुकताच तिने इंडस्ट्रीमधील काही अभिनेत्रींवर तिचा निशाणा साधलाय. एका मुलाखतीत कंगनाने म्हटलं होतं की 'तापसी पन्नू आणि स्वरा भास्कर सारख्या आऊटसाईडर्स अभिनेत्री येऊन सांगणार की केवळ कंगनालाच करण जोहरसोबत अडचण आहे. आम्हाला करण जोहर आवडतो. जर तुम्हालासुद्धा करण आवडत असेल तरी देखील तुम्ही  बी-ग्रेड अभिनेत्री का आहात?' कंगनाच्या या वक्तव्यावर स्वरा आणि तापसीने तिची चांगलीच शाळा घेतली आहे. 

कंगना त्यांचा केवळ बी-ग्रेड अभिनेत्री बोलून थांबली नाही तर ती पुढे म्हणाली 'तुम्ही दोघी आलिया आणि अनन्यापेक्षा चांगल्या अभिनेत्री आहात. तरी देखील तुम्हाला काम का मिळत नाही? तुमच्या लोकांचं असणंच घराणेशाहीला कारणीभूत आहे.' कंगनाच्या या वक्तव्यावर स्वरा आणि तापसी चांगल्यांच संतापल्या आहेत. दोघींनी तिला त्यांच्या भाषेत खडसावलं आहे.

यावर प्रतिक्रिया देताना अभिनेत्री स्वरा भास्करने लिहिलंय, 'गरज असलेली बाहेरची व्यक्ती, बी-ग्रेड अभिनेत्री मात्र आलिया भट्ट आणि अनन्याच्या तुलनेत दिसायला सुंदर आणि उत्तम अभिनेत्री. वाह वाह मला वाटतं की ही माझी स्तुती होती. धन्यवाद कंगना. मला वाटतं की तु खूप सुंदर, उदार आणि एक महान अभिनेत्री आहेस. तु चमकत राहा.'

तर दुसरीकडे सोशल मिडियावर तिचं परखड मत व्यक्त करणारी तापसी पन्नू तिला उत्तर देताना लिहिते, 'मी असं ऐकलं की १२ वी आणि १० वीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आमचा निकाल देखील आला आहे. आमची ग्रेड सिस्टीम आता अधिकृत आहे? आत्तापर्यंत तर नंबर सिस्टीमवर किंमत ठरत होती ना?'

स्वरा आणि तापसीने गोड बोलत कंगनाचा चांगलच सुनावलं आहे. या दोघांचंही ट्वीट सोशल मिडियावर चांगलंच व्हायरल होतंय.  

kangana ranaut says taapsee swara b grade actress  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

Asia Cup Final: स्मृती मानधना - शफली वर्माचे तब्बल तीन वर्ल्ड रेकॉर्ड! भारताचे श्रीलंकेसमोर भलंमोठं लक्ष्य

SCROLL FOR NEXT