Popular actress Maneesha Mahesh to play the titular role in upcoming show 'Singa Penne' Esakal
मनोरंजन

Tejas Trailer: "अब जंग होगी"! वायुसेना दिनानिमित्त कंगनाच्या 'तेजस' चित्रपटाचा अ‍ॅक्शन अन् थ्रिलर ट्रेलर रिलिज!

Kangana Ranaut film Tejas Trailer: कंगना राणौतचा मोस्ट अवेटेड चित्रपट तेजसचा ट्रेलर रिलीज झाला आहे.

Vaishali Patil

Kangana Ranaut film Tejas Trailer: बॉलीवूडची क्वीन कंगना राणौत सध्या तिच्या आगामी सिनेमा 'तेजस'मुळे चर्चेत आहे. काही दिवसांपुर्वी या चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या टिझरमध्ये कंगनाच्या अॅक्शन आणि साहसाने सर्वांनाच आकर्षित केले होते. मात्र टिझर पाहिल्यानंतर प्रेक्षकांना प्रतिक्षा होती ती कंगनाच्या तेजस सिनेमाच्या ट्रेलरची.

आज 8 ऑक्टोबर रोजी वायुसेना दिनानिमित्त कंगनाने तिच्या बहुप्रतिक्षित तेजस सिनेमाचा टिझर रिलिज केला आहे.

या ट्रेलरमध्ये कंगना एका शुर आणि शक्तिशाली वायुसेनेची पायलट तेजस गिलची भुमिका साकारत आहे. या चित्रपटातील "भारत को छेडोगे तो छोड़ेंगे नहीं" अशाप्रकारचे अप्रतिम संवाद सर्वांना आकर्षित करतात.

जबरदस्त साउंडट्रॅक आणि व्हिज्युअल इफेक्ट्ससह हा धमाकेदार ट्रेलर रिलिज झाला आहे. हा एक विजुअल स्पेक्टिकल चित्रपट ठरणार आहे.

चित्रपटातील जबरदस्त संवाद देशभक्तीची भावना जागृत करतो. वीर वायुसेनेच्या पायलटच्या कंगना मोठ्या पडद्यावर तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत आहे.

तेजस चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर भारतातील पहिला एरियल अॅक्शन चित्रपट असणार आहे असं बोललं जात आहे. एका भारतीय गुप्तहेरला दहशतवाद्यांनी पकडल्याचे ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे. आपल्या माणसाला परत आण्यासाठी कंगना पुढाकार घेते. त्यानंतर कंगना अनेक अडथळ्यांचा सामना करताना दिसते.

RSVP निर्मित तेजसमध्ये कंगना राणौत मुख्य भूमिकेत आहे. तेजस हा सर्वेश मेवाडा लिखित आणि दिग्दर्शित आणि रॉनी स्क्रूवाला निर्मित आहे. तेजस हा चित्रपट 27 ऑक्टोबर 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT