Kangana Ranauts first looks as Jayalalithaa in Thalaivi revealed
Kangana Ranauts first looks as Jayalalithaa in Thalaivi revealed 
मनोरंजन

'थलाइवी' चा पहिला पोस्टर रिलिज, कंगणाचा थक्क करणारा लुक एकदा बघाच !

वृत्तसंस्था

मुंबई : कंगणाची ओळख ही तिच्या बोल्ड आणि स्पष्टवक्तेपणासाठी आहे. तिची चित्रपटासाठीची निवडही वेगळी आहे. उत्तम अभिनयाने कंगणाने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. कंगणा एका खास चित्रपटाची तयारी गेले बरेच दिवस करत होती. कायम चर्चेत आणि वादात राहिलेल्या जयललिता यांच्यावरच्या या बायोपिकचं नावं आहे ‘थलाइवी’.त्याची चर्चा गेले बरेच दिवस सुरु आहे. या बायोपिकचा पहिला पोस्टर नुकताच प्रदर्शित झाला आहे. 

कंगणा या चित्रपटासाठी भरपूर मेहनत घेत होती. त्याचे व्हिडीओ आणि फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. हा चित्रपट म्हणजे तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या आयुष्यावर आधारीत आहे. त्याच्या पहिला पोस्टर रिलिज झाला असून कंगणा त्यामध्ये जयललिता यांच्या व्यक्तीरेखेत दिसतेय. पोस्टरमधील जयललिता यांच्या लुकमधील कंगणाला ओळखणे जवळपास कठीण झाले आहे. 
कंगणाची बहिण रंगोली चांडेल हिने ट्विटरवर हा पोस्टर शेअर केला आहे. कंगणा यामध्ये हुबेहुब जयललितांसारखी दिसत आहे. पोस्टर रिलिज झाल्यापासूने चाहत्यांमध्ये चित्रपटासाठी उत्सुकता वाढली आहे. पोस्टरसोबतच चित्रपटाची प्रदर्शित होण्याची तारीखही रिजिज करण्य़ात आली आहे. पुढील वर्षी 26 जून 2020 ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

या चित्रपटामध्ये जयललिता यांच्या हुबेहुब लुकसाठी कंगणावर प्रोस्थेटिक मेकअपचा वापर करण्यात आला. काही दिवसांपूर्वीच हा चित्रपट वादामध्ये अडकला होता कारण, जयललिता यांची भाची जे.दीपा यांनी बायोपिकवर आक्षेप घेत मद्रास हायकोर्टात धाव घेतली होती.

याच चित्रपचासाठी कंगणा सध्या जीव तोडून मेहनत घेताना दिसत आहे. त्यासाठी ती सध्या मनालीमधल्या तिच्या घरी आहे. दिवाळीचं सेलिब्रेशनही तिनं त्याच घरी साजरं केलं. 'थलाइवी' सिनेमाची एक टीम कंगणासह मनालीमध्ये आहे आणि त्यांच्यासोबत ती दिवसेंदिवस मेहनत घेताना दिसत आहे.या चित्रपटाच्या शुटींगचा पहिला टप्पा कर्नाटकात पार पडणार आहे. हा चित्रपट तामिळ, तेलुगु आणि हिंदी अशा तीन भाषांमध्ये  रिलीज होणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन ए.एल. विजय हे करत आहेत. या चित्रपटासाठी कंगनाला दररोज काही तास द्यावे लागणार आहेत. ‘थलाइवी’ची चर्चा ही फक्त बॉलिवूड आणि टॉलिवूडमध्येच नाही तर राजकीय क्षेत्रातही या चित्रपटाविषयी आणि कंगनाच्या भूमिकेविषयी जोरदार चर्चा आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: नसीम खान यांची नाराजी दूर करण्यात काँग्रेसला यश? पुण्यात धंगेकरांच्या प्रचारासाठी लावली हजेरी

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकली, MI आत्मसन्मानासाठी तर KKR प्ले ऑफसाठी खेळणार

Rohit Sharma MI vs KKR : टी 20 वर्ल्डकपचा संघ जाहीर होताच मुंबईच्या प्लेईंग 11 मधून रोहितचं नाव गायब, काय आहे कारण?

Pune Loksabha election 2024 : ''आरक्षणाच्या पन्नास टक्क्यांच्या मर्यादेबद्दल मोदींनी भूमिका जाहीर करावी, आमचं ठरलंय...'' राहुल गांधी स्पष्टच बोलले

Latest Marathi News Live Update : मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत- राहुल गांधी

SCROLL FOR NEXT