Kannada Actor Nagabhushana Arrest After His Car Hits Couple On Footpath A Women Dead In Bengaluru  SAKAL
मनोरंजन

Actor Nagabhushan: कन्नड अभिनेता नागभूषणने जोडप्याच्या अंगावर घातली भरधाव कार; महिलेचा मृत्यू

साऊथ अभिनेता नागभूषणने एका दांम्पत्याला गाडीने उडवल्याची धक्कादायक घटना घडली आहे

Devendra Jadhav

Actor Nagabhushana News: कन्नड अभिनेता नागभूषण याने शनिवारी बेंगळुरूमध्ये एका जोडप्याला त्याच्या कारने धडक दिली. यात महिलेचा मृत्यू झाला तर पुरुषावर उपचार सुरू आहेत.

बेंगळुरूमधील कुमारस्वामी वाहतूक पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तक्रारीत याला वेगात आणि निष्काळजीपणे गाडी चालवल्याचे म्हटले आहे.

शनिवारी ३० सप्टेंबरला रात्री ९.४५ च्या सुमारास नागभूषणने वसंता पुरा मुख्य रस्त्यावरील फुटपाथवरून चालत असलेल्या जोडप्याला कारने धडक दिली.

यावेळी अभिनेता उत्तरहल्लीहून कोननकुंटेकडे निघाला होता. त्यादरम्यान ही घटना घडली. धडक इतकी जबरदस्त होती की जोडप्यापैकी महिला तत्काळ मृत पावली

नागभूषणने दिलेल्या धडकेत त्या दाम्पत्यापैकी पत्नी, प्रेमा (48) हिचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. तर तिचा नवरा कृष्णा (58) याच्या दोन्ही पायांना, डोक्याला आणि पोटाला दुखापत गंभीर दुखापत झालीय.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नागभूषणने स्वत: या जोडप्याला रुग्णालयात नेले. आता या गंभीर गुन्ह्यासाठी नागभूषणवर FIR दाखल करण्यात आला असुन त्याला अटक होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT