Kannada actress Chethana Raj passes away after plastic surgery Google
मनोरंजन

Plastic surgery नंतर कन्नड अभिनेत्रीचा खाजगी रुग्णालयात मृत्यू

२१ वर्षीय चेतना राजनं आतापर्यंत अनेक कन्नड मालिका आणि सिनेमातून काम करून प्रसिद्धी मिळवली होती.

प्रणाली मोरे

छोट्या पडद्यावर कन्नड(Kannad) मालिकेत काम करून आपल्या अभिनयानं घराघरात प्रसिद्ध झालेली अभिनेत्री चेतना राजचं(Chethana Raj) निधन झालं आहे. अवघ्या २१ व्या वर्षी अभिनेत्रीनं जगाचा निरोप घेतल्यानं केवळ अभिनय क्षेत्रात नाही तर सर्वसामान्य चाहत्यांमध्येही हळहळ व्यक्त केली जात आहे. मीडियाला मिळालेल्या वृत्तानुसार,बंगळुरुमधील एका खाजगी रुग्णालयात(Hospital) चेतना राजचं निधन झाल्याचं कळत आहे. सर्वात अधिक धक्का तिच्या मृत्यूचं कारण समजल्यानंतर प्रत्येकाला लागला आहे. बोललं जात आहे की, रुग्णालयात प्लास्टिक सर्जरी केल्यानंतर तिचं निधन झालं आहे.

१६ मे रोजी सकाळी चेतनाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिच्यावर 'फॅट फ्री' शस्त्रक्रिया करण्यात आली पण त्यानंतर तिच्या शरीरात बदल जाणवू लागले. फुफ्फुसात पाणी शिरल्यामुळे काल संध्याकाळी तिची तब्येत आणखीनच खालावली. तिला श्वसनाचा त्रास देखील होवू लागला.

चेतनाचा मृतदेह अद्याप बंगळुरुमधील रुग्णालयात आहे. शवविच्छेदनासाठी तो रमय्या रुग्णालयात नेण्यात येणार असल्याचं कळत आहे. चेतना राजच्या अचानक झालेल्या मृत्यू प्रकरणी जवळच्याच पोलिस ठाण्यात रुग्णालय समितीच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यासंदर्भात अधिक माहिती लवकरच देण्यात येईल असं बोललं जात आहे.

चेतना राजचे कुटुंबिय बेंगुळुरुमधील अबेगेरे इथं राहत होते. चेतनानं आतापर्यंत अनेक सिनेमा आणि मालिकांमध्ये काम केलं होतं. 'गीता आणि दोरेसानी' अशा मालिकांमध्ये अभिनेत्री चेतना राजनं काम केलं होतं. तिनं 'हवाईयन' सिनेमातही महत्त्वाची भूमिका साकारली होती. आज मनोरंजन सृष्टीत अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या सुंदर दिसण्यासाठी किंवा फिगर चांगली दिसण्यासाठी वेगवेगळ्या सर्जरी करीत असतात. प्रियंका चोप्रा,शिल्पा शेट्टी,अनु्ष्का शर्मा,जान्हवी कपूर,श्रृती हसन,आयेशा टाकिया या अभिनेत्रींनी देखील प्लॅस्टिक सर्जरी केली आहे. अर्थात या सर्जरीनंतर काहीजणींना ट्रोलिंगला देखील सामोरं जावं लागलं होतं. पण चेतना राजचा मृत्यूच झाल्या कारणानं ही सर्जरी आता चिंतेची बाब बनू लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शासनाची भन्नाट योजना! ३ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या गरजूंना आता न्यायालयातील केससाठी मिळणार मोफत वकील; जन्मदाखला काढण्यासाठीही विनाशुल्क मदत, वाचा....

आजचे राशिभविष्य - 14 ऑगस्ट 2026

आरोग्य स्वातंत्र्य की रोगाचे पारतंत्र्य

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 14 ऑगस्ट 2026

ढिंग टांग : झुरळांचा झपुर्झा..!

SCROLL FOR NEXT