shefali 
मनोरंजन

'काटा लगा' फेम शेफाली जरीवालाचा बोल्ड डान्स.. टिकटॉकवर व्हिडिओ व्हायरल

सकाळ वृत्तसेवा

मुंबई- 'बिग बॉस' फेम आणि 'काटा लगा' गर्ल शेफाली जरीवाला लॉकडाऊनमध्ये घरातंच मजा मस्ती करताना दिसतेय..बिग बॉसमध्ये कुटुंबापासून अनेक दिवस दूर राहिलेली शेफाली आता क्वारंटाईन काळात मात्र तिचा सगळा वेळ कुटुंबासोबत एन्जॉय करत घालवत आहे..एवढंच नाही तर शेफाली तिचे मजा-मस्तीचे व्हिडिओ तिच्या चाहत्यांसाठी सोशल मिडीयावर शेअर देखील करत असते..नुकताच शेफालीने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यात ती बोल्ड अंदाजात डान्स करताना दिसून येतेय..

शेफालीने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केलेला हा व्हिडिओ टिकटॉक व्हिडिओ आहे..या व्हिडिओमध्ये ती ले जा ले जा या गाण्यावर डान्स करतेय..शेफालीने यात काळ्या रंगांचं आऊटफिट घातलं असून ती तिच्या बोल्ड अंदाजात यावर डान्स करत आहे..शेफाली जरीवालाचा हा व्हिडिओ प्रेक्षकांना खूपंच आवडतोय..हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर याला लगेचच एक लाखापेक्षा जास्त व्ह्युज मिळाले आहेत..

याआधीही शेफालीने तिचे अनेक टिकटॉक व्हिडिओ तिच्या चाहत्यांसाठी शेअर केले आहेत..या क्वारंटाईन काळात शेफाली पती परागसोबत चांगलाच वेळ घालवताना दिसतेय..काही दिवसांपूर्वी शेफाली तिच्या व्हिडिंओव्यतिरिक्त आणखी एका गोष्टीमुळे चर्चेत होती ते म्हणजे प्रेग्नंसी..

शेफालीेने परागसोबत एक फोटो पोस्ट केला होता ज्यात तिचं पोट बेबी बंप सारखं दिसत होतं..तेव्हा तिच्या चाहत्यांनी या फोटोवर कमेंट करत तुम्ही प्रेग्नंच आहात का असं विचारलं होतं..यावर शेफालीने उत्तर देत म्हटलं, की त्यावेळी मी जरा जास्त खाल्ल होतं.. शेफाली नुकतीच बिग बॉस १३ मध्ये दिसून आली होती..यावेळी आसिम रियाज सोबतच्या भांडणामुळे ती चर्चेत राहिली होती.

kanta lga girl shefali jariwala bold dance video goes viral on tiktok

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil : राष्ट्रवादीच्या नाशिकच्या शिबिरात जयंत पाटलांचा गोंधळ! शिबिराऐवजी हवनाकडे वळले अन्...

Mobile Recharge Rules : फोनला रिचार्ज नसल्यास सिमकार्ड किती दिवस काम करते? खूप महिने बंद राहिल्यास काय होते, जाणून घ्या सर्व काही

Mangalwedha Rain : मंगळवेढ्यात सततच्या पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांची चिंता वाढली

Godavari Flood: गोदावरी नदीत जायकवाडी धरणातून पाणी विसर्ग; गेवराई तालुक्यातील बत्तीस गावांचा संपर्क तुटला

Latest Marathi News Updates: विरार - दादर लोकल ट्रेनमध्ये माथेफिरूचा धुमाकूळ; रेल्वे प्रवासी महिलांची सुरक्षा वाऱ्यावर

SCROLL FOR NEXT