kapil sharma and krushna abhishek 
मनोरंजन

कपिल शर्मा आणि कृष्णा अभिषेकचा ७०च्या दशकातील लूक तोही बेबी फिल्टरसोबत, पाहा मजेशीर व्हिडिओ

दिपालीराणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- लॉकडाऊननंतर मोठ्या ब्रेकने कपिल शर्माचा कॉमेडी शो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या शोची प्रेक्षकांमध्ये खूप उत्सुकता होती. अखेर हा शो प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि खूप दिवसांनी प्रेक्षकांमध्ये हशा पिकला. कपिल शर्मा आणि त्याची टीम छोट्या पडद्यावर पुन्हा त्यांच्या अंदाजात परत आली आहे. लॉकडाऊननंतर पहिल्याच एपिसोडची सुरुवात अभिनेता सोनू सूदपासून जबरदस्त अंदाजात झाली आहे. प्रेक्षकही या शोच्या पुन्हा एकदा प्रेमात पडले आहेत.

नुकताच कपिलच्या शोच्या सेटवरील एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये कपिल शर्मासोबत सपनाचं पात्र साकारणारा कॉमेडियन कृष्णा अभिषेक मस्तीच्या मूडमध्ये दिसून येतोय. दोघंही या व्हिडिओमध्ये बेबी फिल्टरमध्ये दिसून येतायेत. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये कृष्णा अमिताभ बच्चन आणि शशि कपूरचा सूपरहिट सिनेमा 'दीवार' मधील डायलॉग बोलतोय. 

कृष्णा अभिषेक बिग बींचा डायलॉग बोलत आहे, 'आज मेरे पास बंगला है, गाडी है, बँक बॅलन्स है, तुम्हारे पास क्या है?'  यावर कपिल म्हणतो, 'भाई एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत तर एखादी विकून दांत का नाही लावून घेत?' हा व्हिडिओ कपिल शर्माने त्याच्या इंस्टाग्राम एकाऊंटवरुन शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिलंय, '७०च्या दशकातील लोक तोही बेबी फिल्टरसोबत.'

लॉकडाऊमुळे सिनेमा आणि मालिकांच्या शूटींगला बंदी होती. मात्र आता ४ महिन्यांनंतर शूटींग पुन्हा एकदा सुरु झाली आहे. ज्यामुळे चाहते त्यांच्या आवडच्या शोचा मनमुराद आनंद घेत आहेत.  

kapil sharma and krushna abhishek will crack you up with their hilarious conversation  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident News: अहिल्यानगरमध्ये मोठा अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल झाले, ९ वाहनांना धडक दिली अन्...; भीषण घटना

Paralysis Warning Signs : पॅरालिसिसचा झटका येण्याआधी शरीरात दिसतात 'हे' 2 बदल; चुकूनही करू नका दुर्लक्ष, नाहीतर जीव गमवाल

Pooja Khedkar: पुजा खेडकर कुटुंबाचा नवा वाद! नवी मुंबईतील अपहरणकर्ता पुण्यातील घरी आढळला, पोलिसांचा तपास सुरू...

Latest Marathi News Updates: ठाकरे गटाच्या खासदारांनी धाराशिव येथे पाकिस्तानचे झेंडे फडकवले - चंद्रशेखर बावनकुळे

Dhule News : आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे बोगस डॉक्टरांवर कारवाईचे आदेश

SCROLL FOR NEXT