kapil sharma. kapil sharma son birthday , comedy nights with kapil
kapil sharma. kapil sharma son birthday , comedy nights with kapil SAKAL
मनोरंजन

Kapil Sharma: दणक्यात साजरा झाला कपिलच्या मुलाचा वाढदिवस, कपिल इमोशनल होऊन म्हणाला...

Devendra Jadhav

Kapil Sharma: विनोदाचा बादशहा म्हणून कपिल शर्माची ओळख आहे. कपिलने टीव्ही इंडस्ट्रीत कॉमेडी नाईटस विथ कपिल च्या माध्यमातून त्याचा एक चाहता वर्ग निर्माण केलाय. आजवर या कार्यक्रमात अमिताभ बच्चन पासून नागराज मंजुळे पर्यंत अनेक हिंदी आणि मराठी सेलिब्रिटी येऊन गेले. कपिल शूटिंगमधून वेळात वेळ काढत त्याच्या फॅमिलीसोबत सुद्धा मजेत एन्जॉय करताना दिसतो. कपिलचा मुलगा त्रिशानचा नुकताच दुसरा बर्थडे झाला. यावेळी कपिलने मुलासाठी लिहिलेली खास पोस्ट चर्चेत आहे.

(kapil sharma celebrates his son trishaan 2nd birthday, writes emotional post for son )

वाढदिवसाच्या शुभेच्छा.. त्रिशान आमच्या आयुष्यात सुंदर रंग भरल्याबद्दल धन्यवाद.. मला आयुष्यात या दोन अनमोल भेटवस्तू दिल्याबद्दल धन्यवाद असं म्हणत कपिलने शेवटी त्याची बायको गिन्नीचे आभार मानले. कपिल टीव्ही वर जितका हसवतो तितकाच तो खऱ्या आयुष्यात इमोशनल आहे. कपिल त्याची बायको आणि दोन मुलांसोबत जमेल तसा चांगला वेळ घालवताना दिसतो

कपिल शर्मा शोचा नवीन सिझन काही दिवसांपूर्वी सुरु झाला. हा नवीन सिझन सुद्धा प्रचंड गाजतोय. या नवीन सिझनची खासियत म्हणजे फक्त कलाकार नाही तर विविध क्षेत्रातील असामान्य व्यक्ती या शो मध्ये सहभागी आहेत. काही दिवसांपूर्वी या शो मध्ये खान सर, गौर गोपाल प्रभू अशी प्रेरणादायी व्यक्तिमत्व आले होते. याशिवाय स्टॅन्ड अप कॉमेडियन्स झाकीर खान, कुशा कपिला, अभिषेक उपमन्यु, अनुभव सिंग बस्सी असे कलाकार आले होते.

'द कपिल शर्मा शो'मध्ये जबरदस्त कॉमेडी करणारा कृष्णा अभिषेक लवकरच शोमध्ये परतणार अशी चर्चा होती. शोच्या तिसऱ्या सीझनमध्ये तो परतला नाही. फीसवरून निर्माते आणि कृष्णा मध्ये मध्ये मतभेद झाल्याची सुद्धा चर्चा होती. कमी फीमुळे कृष्णाने शो करण्यास नकार दिला. त्यानंतर, कृष्णा सध्या पत्नी कश्मीरा शाहसोबत बिग बॉसचा एक्स्टेंशन शो द बिग बझमध्ये होस्ट करतोय. बिग बॉस १२ फेब्रुवारीला संपतोय. त्यामुळे बिग बॉस संपल्यानंतर कृष्णा पुन्हा एकदा कपिल शर्मा शो मध्ये परतण्याची दाट शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नागपूर हळहळलं! खरेदीसाठी गेल्या जवानांवर काळाचा घाला, भीषण अपघातात दोंघाचा मृत्यू; ऑटोचालकासह सहा जवान गंभीर जखमी

Shikhar Dhawan: लेकाच्या विरहानं शिखर व्याकुळ; फादर्स डेच्या शुभेच्छा देताना म्हणाला, 'त्याच्याशी बोललो नाहीये...'

Jerusalem : दिवसाउजेडी हल्ले थांबवणार; गाझातील मदतकार्याच्या सोयीसाठी इस्राईलकडून घोषणा

Russia-Ukraine Conflict : ‘युक्रेन’बाबत स्वित्झर्लंडमध्ये बैठक; रशियाच्या अनुपस्थितीने तोडग्याची शक्यता कमीच

Prataprao Chikhlikar: मनोज जरांगेंची हवा नांदेडपर्यंत...! प्रतापराव चिखलीकरांचा गेम कसा झाला?

SCROLL FOR NEXT