Kapil Sharma Google
मनोरंजन

कपिल शर्मा 'काश्मिर' विरोधात काय बोलला? त्याच्या 'शो' वर बंदीची मागणी

'कपिल शर्मा शो' नेहमीच अनेक वादग्रस्त विधानांमुळे गोत्यात आला आहे.

प्रणाली मोरे

'कपिल शर्मा शो'(Kapil Sharma Show) गेली अनेक वर्ष जगभरात वसलेल्या भारतीयांचं अविरतपणे मनोरंजन करीत आहे. तसं पहायला गेलं तर शो अनेक वेळा वादांमुळेच जास्त चर्चेत राहिला. शो मध्ये कधी कुणावर केली जाणारी टीका वादाला कारणीभूत ठरली तर कधी कपिलच्या नको त्या ट्वीट्समुळेदेखील शो च्या लोकप्रियतेवर परिणाम झालेला दिसून आला. पण आता आणखी एका कारणामुळे शो वादात सापडलाय. आता तर चक्क शो वर बंदी आणण्याची मागणी केली जातेय. काय आहे नेमकं प्रकरण?

आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की 'कपिल शर्मा शो' मध्ये बॉलीवूडच्या अनेक फिल्म्स प्रमोशनसाठी येतात,त्यानिमित्तानं त्यातील कलाकारही तिथे येऊन धम्माल करतात. इतकंच काय तर मराठीतल्या काही सिनेमांनाही कपिलच्या शो मध्ये निमंत्रण मिळालं होतं. पण बातमी आहे की विवेक अग्निहोत्री यांच्या 'द काश्मिर फाईल्स' या सिनेमाचं प्रमोशन आपल्या शो मध्ये करण्यास कपिलनं नकार दिला आहे. यावरनं विवेक यांनी ट्वीटरवर पोस्ट करून नाराजगी व्यक्त केली होती. त्यांनी थेट पोस्टमध्ये म्हटलं होतं की कपिल शर्मा शो नं त्याच्या शो मध्ये द काश्मिर फाईल्स सिनेमाचं प्रमोशन करण्याची आमची विनंती फेटाळली आहे. आमच्या सिनेमात मोठे कलाकार नाही म्हणून कपिल सिनेमाचं प्रमोशन करत नाही असंही त्यांनी म्हटलं होतं. त्यांच्या त्या पोस्टला आरोपाचा सूर होता. पण त्याचे भलतेच परिणाम नंतर दिसून येत आहेत. ट्वीटरवर 'कपिल शर्मा शो' च्या विरोधात नेटिझन्सनी संतापत बंदीची मागणी केली आहे. इतकंच काय तर ट्वीटरवर सध्या #Boycottkapilsharmashow हा हॅशटॅग टॉप ट्रेंडिंगला आहे. म्हणजे आता काश्मिरचा चांगलाच दणका कपिलला बसणार हे निश्चित.

काही दिवसांपूर्वी बॉलीवूडच्या खिलाडी कुमार म्हणजे आपल्या अक्षय कुमारनेही(Akshay Kumar) कपिलच्या मोदींविरोधातल्या वक्तव्याचा निषेध करीत एक महत्तवाचा निर्णय घेतला होता. त्यानं आपल्या 'बच्चन पांडे' सिनेमाचं प्रमोशन 'कपिल शर्मा शो' मध्ये करणार नाही असं ठरवलं होतं. पण त्यानंतर कपिलनं जाहिरपणे त्याची माफी मागितली आणि आता सगळं आलबेल झालं असं म्हणतायत. पण नेटिझन्सना कोण समजावणार. त्यांनी तर थेट ट्वीटरवर कपिल विरोधात आंदोलनच पुकारलंय. आता विवेक अग्निहोत्री यांच्या आरोपावर कपिल किंवा त्याच्या टीमकडून काय उत्तर येतंय आणि वादावर पडदा कधी पडतोय याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT