Kapil Sharma debut song Alone Instagram
मनोरंजन

Kapil Sharma चं नवं गाणं Alone चर्चेत..कॉमेडीयननं गाण्यातून सांगितलीय आपल्या ब्रेकअपची कहाणी

कपिल शर्मानं म्युझिक इंडस्ट्रीत गुरु रंधावासोबत Alone या आपल्या पहिल्या गाण्याच्या माध्यमातून एन्ट्री केली आहे.

प्रणाली मोरे

Kapil Sharma New Song Alone: छोट्या पडद्यावरचा प्रसिद्ध शो 'द कपिल शर्मा शो' होस्ट करणाऱ्या कपिल शर्मानं म्युझिक इंडस्ट्रीत एन्ट्री केली आहे. कॉमेडियन कपिल शर्मा आणि गायक गुरु रंधावा यांचं नवं गाणं 'Alone' रिलीज झालं आहे.

व्हिडीओमध्ये गुरु,कपिल व्यतिरिक्त योगिता बिहानी देखील आहे. गाण्याचं शूटिंग मनालीच्या डोंगर रांगांमध्ये करण्यात आलं आहे. व्हिडीओमध्ये कॉमेडी किंग एकदम वेगळ्या लूकमध्ये दिसत आहे.

त्याचा स्वॅग आणि किलर अंदाज पहाण्यासारखा आहे. गाण्याचे बोल गुरु रंधावानं लिहिले आहेत आणि संगीत संजयनं दिलं आहे. हा व्हिडीओ ४ मिनिटांचा आहे. व्हिडिओमध्ये कपिलचं ब्रेकअप होताना दाखवलं आहे..ज्यात त्याची गर्लफ्रेंड त्याला सोडून जाते. या गाण्यात कपिलची गर्लफ्रेंड लग्नाचं प्रपोजल आधी मान्य करते आणि नंतर त्याला सोडून जाते असा सीक्वेन्स शूट करण्यातआला आहे.

माहितीसाठी थोडक्यात सांगते की कपिलनं बॉलीवूडमध्ये 'किस किसको प्यार करू' सिनेमातून पदार्पण केलं होतं. आणि शेवटचं त्याला 'फिरंगी' सिनेमात पाहिलं गेलं होतं.

टीसीरीजच्या युट्यूब चॅनलवर गुरुवारी ९ फेब्रुवारी रोजी हे गाणं रिलीज झाल्यानंतर आतापर्यंत त्यावर ७ लाखाहून अधिक व्ह्यूज आले आहेत. या गाण्यात नेहमीच चेहऱ्यावर हसू ठेवणारा कपिल भलताच उदास दिसत आहे.

या गाण्याच्या शूटिंगचे काही व्हिडीओ कपिलने त्याच्या इन्स्टाग्राम हॅंडलवर शेअर केले आहेत. कपिलनं खास व्हॅलेंटाईन वीक निमित्तानं हे गाणं रिलीज केलं आहे. लोकांना ४ मिनिटाचं हे गाणं आवडलं खरं पण कपिलच्या चेहऱ्यावरची उदासी मात्र त्याच्या चाहत्यांना अपसेट करून गेली.

कपिल शर्मा जेव्हा जेव्हा कॅमेऱ्यासमोर येतो तेव्हा तेव्हा तो लोकांना हसवायचं काम करतो पण यावळेला मात्र तो त्या गाण्यात दुःखी अवस्थेत दिसणार आहे. या गाण्यात कपिल आणि योगिताची लव्हस्टोरी दाखवण्यात आली आहे.

पण यातला कपिल दुःखी अवतार लोकांना आवडलेला नाही. लोक कमेंट करताना दिसत आहेत की,'सर तुम्ही रडू नका..', एका नेटकऱ्यानं कमेंट करताना लिहिलं आहे की,'कपिल पाजी,तुमचं हे गाणं मनाला खूपच भावलं आहे..तुम्हाला रडताना पाहून मलाही अश्रू अनावर झाले'.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Visarjan 2025 Live Updates: पुढच्या वर्षी लवकर या! पुणे, मुंबईसह आज राज्यात गणेश विसर्जन मिरवणुकीची धूम

Ganesh Visarjan 2025: गणेश विसर्जनाच्या दिवशी नैवेद्यात बनवा 'हे' चविष्ट हलवा, बाप्पा प्रसन्न होतील

Vijay Wadettiwar: सरकारकडून मराठा समाजाची फसवणूक: काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार; 'ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष उभा केल्याचा आरोप'

Latest Maharashtra News Updates : अंतरवाली सराटीत ओबीसींचे उपोषण तूर्त स्थगित, मंत्री अतुल सावे यांच्या आश्वासनानंतर निर्णय

पंतप्रधानांनी लोकार्पण केलेल्या १५०२४ पैकी ५०० बेघर लाभार्थीच गेले घरकुलात रहायला! देशातील सर्वात मोठ्या ‘रे नगर’ गृहप्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील ९००० घरे तयार

SCROLL FOR NEXT