Kapil Sharma New show Netflix OTT Platform esakal
मनोरंजन

Kapil Sharma : कपिलनं केली त्याच्या नव्या शो ची घोषणा, काय आहे नाव? चाहत्यांना उत्सुकता!

टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध सेलिब्रेटी म्हणून आता कपिल शर्मा चे नाव घेतले जाते.

युगंधर ताजणे

Kapil Sharma New show Netflix OTT Platform : टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध सेलिब्रेटी म्हणून आता कपिल शर्मा चे नाव घेतले जाते. गेल्या दशकापासून तो कमालीच्या वेगानं प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. त्याची कॉमेडी, त्याचं सादरीकरण याची नेहमीच चर्चाही रंगली आहे. आता तो त्याच्या नव्या कॉमेडी शो च्या घोषणेमुळे चर्चेत आला आहे.

कपिलनं इंस्टावरुन त्याच्या नव्या शो चा प्रोमो शेयर केला आहे. कपिलच्या नव्या शो विषयी नेटफ्लिक्सच्या भारतातील कंटेट हेड मोनिका शेरगील यांनी सांगितलं आहे की, कपिलच्या लोकप्रियतेविषयी वेगळं काही सांगण्याची गरज नाही. त्यानं आजवर लाखो नेटकऱ्यांचे, चाहत्यांचे मनोरंजन केले आहे. त्यामुळे त्याचा फॅनबेसही मोठा आहे. आता तर घराघरात त्याचा मनोरंजन शो आवडीनं पाहिला जातो.

इतक्या लहान मुलांना फटाके वाजवायचे नसतात हे कसं समजवायचं?

बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींना कपिलच्या शो ची भुरळ पडलेली आहे. ते त्यांच्या नव्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कपिलच्या शो मध्ये जातात. कपिल नेटफ्लिक्ससोबत नवा शो सुरु करणार आहे अशी चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी कपिलनं सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण नवं घर घेणार असल्याचे सांगितले होते. मात्र सध्या कपिलनं घर बदलण्याचा आपला विचार नसून आपण शो च्या प्रमोशनसाठी एक युक्ती केली होती. असे म्हटले होते.

कपिल हा डिजिटल प्लॅटफॉर्मवर त्याचा नवा शो घेऊन येत आहे. यापूर्वी त्याच्या कपिल कॉमेडी शो ला चाहत्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले होते. यानंतर पहिल्यांदाच कपिल वेगळ्या प्रकारे प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्याच्या या शो मध्ये कृष्णा अभिषेक, कीकू शारदा, राजीव ठाकूर आणि अर्चना पुरन सिंग हे देखील सहभागी होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT