irfan rishi 
मनोरंजन

सोनी टिव्ही वाहिनी ऋषी कपूर, इरफान खान यांना वाहणार 'अशी' श्रद्धांजली...

सकाळ वृत्तसेवा

मुंबई ः अभिनेता इरफान खान आणि अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनाच्या बातम्या ऐकताच संपूर्ण बॉलिवूड हादरलं. दोन्ही महान कलाकारांच्या अचानक एक्झिटमुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली. चित्रपटसृष्टीने एकापाठोपाठ एक दोन सुपरस्टार गमावले आणि चित्रपटसृष्टीबरोबरच जगभरातील प्रेक्षक हळहळ व्यक्त करत आहेत. अभिनेते ऋषी कपूर यांच एव्हरग्रीन व्यक्तिमत्त्व, त्यांचे चित्रपट तसेच इरफानचा रुपेरी पडद्यावर असणारा मनमोकळा वावर नेहमीच प्रेक्षकांच्या आठवणीत राहणारा आहे. आज प्रत्येकजण सोशल मीडियाद्वारे या दोन ग्रेट कलाकारांना वेगवेगळ्या प्रकारे श्रद्धांजली वाहत आहे. आता 'द कपिल शर्मा शो'च्यानिमित्ताने ऋषी कपूर आणि इरफान खान यांना अनोखी श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे.

सोनी टिव्ही वाहिनीवरील 'द कपिल शर्मा शो' हा छोट्या पडद्यावरील बहुचर्चित आणि सगळ्यात लोकप्रिय कॉमेडी शो आहे. या शोमध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली. त्याचबरोबर ऋषी कपूर तसेच इरफान खानही या शोमध्ये यापूर्वी येऊन गेले आहेत. आता या दोन कलाकारांचे जुने एपिसोड पुन्हा एकदा प्रसारित करण्याचा निर्णय या वाहिनीने घेतला आहे.

बॉलिवूडमधील या कलाकारांना श्रद्धांजली म्हणून त्यांचे जुने एपिसोड पुन्हा दाखवण्यात येणार आहेत. अभिनेता किकू शारदाने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरुन ही माहिती दिली. अभिनेते ऋषी कपूर यांनी पत्नी नीतू सिंग यांच्याबरोबर  'द कपिल शर्मा शो'मध्ये हजेरी लावली होती. त्यांचा हा एपिसोड प्रचंड हिटही ठरला होता.

ऋषी कपूर यांचा स्पष्टवक्तेपणा या शोमध्येही दिसून आला होता. ऋषी कपूर आणि नीतू यांच्या सुखी संसाराचे गुपित या एपिसोडमध्ये उघड झाले. तसेच त्यांची रिअल लाईफ केमिस्ट्री प्रेक्षकांना अधिक जवळून पाहता आली.  तसेच इरफान खान त्याच्या 'हिंदी मिडीयम' चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान या शोमध्ये आला होता. इरफानबरोबर या चित्रपटामधील त्याची काही मंडळीही आली होती. हा एपिसोडही प्रचंड गाजला होता. आता चाहत्यांना आपल्या या लाडक्या कलाकारांना पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पाहण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे. 

the kapil sharma show irrfan khan rishi kapoor episodes to re telecast

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Voter Fraud: बापरे! एकाच घरात ४ हजार २७१ मतदार; अधिकाऱ्यांनी केले हात वर, म्हणाले...

Latest Maharashtra News Updates : पुण्यात मुसळधार पाऊस...सखल भागात पाणी साचल्याने वाहतुकीचा खोळंबा

Gold Investment : 'पितृपक्षात सोने खरेदी करू नये' हा गैरसमज मोडीत; सराफ व्यावसायिकांचे निरीक्षण

US tariff on India update: अमेरिका लवकरच मोठा निर्णय घेणार! भारतावरील अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ हटवणार?

Neeraj Chopra कडून घोर निराशा! जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक राखण्यात अपयशी, टॉप-६ मध्येही स्थान नाही

SCROLL FOR NEXT