Kapil Sharma Show news  esakal
मनोरंजन

Kapil Sharma Show: सुनील ग्रोव्हरनंतर कृष्णा अभिषेकचा कपिलला रामराम?

मनोरंजन विश्वातील सर्वाधिक लोकप्रिय असणारा शो म्हणून कपिल शर्माच्या कॉमेडी शो कडे पाहिले जाते.

युगंधर ताजणे

Krushna Abhishek Left Kapil Sharma show- मनोरंजन विश्वातील सर्वाधिक लोकप्रिय असणारा शो म्हणून कपिल शर्माच्या कॉमेडी शो कडे पाहिले जाते. गेल्या काही दिवसांपासून या शो ची वेगळ्या कारणासाठी चर्चा आहे. यापूर्वी (Tv Entertainment News) या कार्यक्रमातून प्रसिद्ध अभिनेता सुनील ग्रोव्हरनं एक्झिट घेतल्याचे दिसून आले आहे. त्याचे आणि कपिलचे वाद हे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यामुळे सुनीलनं आपण हा शो सोडत असल्याचे सांगून (Social Media viral news) चाहत्यांना मोठा धक्का दिला होता. आता आणखी एका मोठ्या कलाकारानं या कार्यक्रमातून आपण बाहेर पडत असल्याचे सांगितले आहे.

काही दिवसांपूर्वी अशी एक बातमी समोर आली होती की, भारती सिंग देखील कपिलच्या शोमध्ये दिसणार नाही. भारती सध्या दुसऱ्या एका शो चे होस्टिंग करत असल्याचे दिसून आले आहे. कपिल शर्मा शो ची धुरा ही एकट्या कपिलच्या खांद्यावर आहे. कपिलचा आक्रमक स्वभाव, आणि बोलणं यामुळे त्याच्याशी अनेकांशी वाद झाले आहे. सुनील ग्रोव्हरशी त्याची कडाक्याची भांडणं झाली होती. कपिलनं एकेरीवर येत सुनीलचा जाहिररीत्या अनेकदा अपमानही केल्याचे सांगण्यात आले होते. अखेर यासगळ्यावर उत्तर म्हणून त्यानं हा शो सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर त्यानं वेगवेगळ्या वेबसीरिजमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते.

आता गोविंदाचा भाचा कृष्णा अभिषेकनं देखील या कार्यक्रमातून आपण बाहेर सोडत असल्याचे सांगितले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कृष्णा लवकरच ही मालिका सोडण्याचा विचार करत आहे. कपिल शर्मा शो चा नवा सीझन आता प्रेक्षकांसमोरच येणार आहे. त्यासंबंधीच्या प्रमोशनच्या पोस्ट कपिल आणि अर्चना पुरन सिंग यांनी शेयर केल्या आहेत. यासगळ्यात समोर आलेली धक्कादायक माहिती म्हणजे कृष्णा अभिषेकनं शो सोडण्याचा घेतलेला निर्णय..

पहिल्यापासून सुनील ग्रोव्हर, कृष्णा अभिषेक आणि अली असगर कपिलच्या कार्यक्रमाचे महत्वाचे भाग राहिले आहेत. त्यांनी प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन देखील केले आहे. आता कृष्णाची शो सोडण्याची बातमी ऐकून त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यानं हा शो का सोडला याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. कृष्णानं निर्मात्यांकडे जे मानधन मागितले आहे ते त्याला देण्यासाठी निर्माते तयार नसल्याचे चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT