Sugandha Mishra and Sanket Bhosale instagram
मनोरंजन

'द कपिल शर्मा शो'मधल्या सुगंधाचं मराठमोळ्या अभिनेत्यासोबत लग्न

येत्या २६ एप्रिल रोजी ही जोडी आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहे.

स्वाती वेमूल

'द कपिल शर्मा शो' या कॉमेडी शोमध्ये भूमिका साकारणारी अभिनेत्री आणि गायिका सुगंधा मिश्रा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. मराठमोळा अभिनेता आणि कॉमेडियन संकेत भोसलेशी ती लग्न करणार आहे. संकेतसोबतचा रोमँटिक फोटो पोस्ट करत सुगंधाने लग्नाची तारीख जाहीर केली. येत्या २६ एप्रिल रोजी ही जोडी आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. सुगंधा आणि संकेतने त्यांच्या प्री-वेडिंगचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. तेव्हापासून त्यांच्या लग्नाची चर्चा सुरू झाली.

'आम्हा दोघांवर इतकं प्रेम करण्यासाठी तुमचे खूप खूप आभार. तुम्हा सर्वांच्या शुभेच्छांसाठी धन्यवाद. २६-४-२०२१', असं लिहित सुगंधाने लग्नाची तारीख घोषित केली. संकेतनेही सुगंधासोबतचे फोटो पोस्ट करत शुभेच्छांबद्दल चाहत्यांचे आभार मानले. सुगंधा आणि संकेतवर सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. जलंधरमध्ये सुगंधाचा विवाहसोहळा पार पडणार असून मोजकेच पाहुणे या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचा : कोरोनावर मात करताच रणबीर-आलिया निघाले मालदिवला

सुगंधा आणि संकेत २०१६ पासून एकमेकांना डेट करत आहेत. २०१७ मध्ये त्यांच्या अफेअर्सच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र त्यावेळी सुगंधाने त्या चर्चा खोट्या असल्याचं स्पष्ट केलं होतं. आम्ही फक्त चांगले मित्र आहोत, असं ती म्हणाली होती. या चर्चांनंतर सुगंधा आणि संकेतने झी टीव्हीवरील 'समर एक्स्प्रेस' या कार्यक्रमाचं एकत्र सूत्रसंचालन केलं होतं. संकेतने 'द कपिल शर्मा शो'मध्ये संजय दत्तची भूमिका साकारली होती. तर सुगंधाने या शोमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत. संकेतचा 'बाबा की चौकी' हा शोसुद्धा चांगलाच प्रसिद्ध आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND W vs PAK W : भारताचा पाकिस्तानला धुळ चारत सर्वात मोठा विजय! दिप्ती शर्माचा विकेट्सचा पंजा, तर श्री चरणीही चमकली

NDA ला मोठा धक्का! 2026 नंतर आघाडीमध्ये पहिली फूट पडली; मोठ्या मित्रपक्षाने साथ सोडली, राजकीय समीकरणे बदलणार?

TMC Split: पश्चिम बंगालच्या राजकारणात भूकंप! टीएमसीचे बंडखोर खासदार दुसऱ्या पक्षात विलीन होणार; NDA ला पाठिंबा देणार

Poet Honoured: रुबाईकार रमेश वैद्य यांना काव्यरसिकचा जीवनगौरव; ‘खरे कवी आणि सच्चे माणूस’ असा हिमांशू कुलकर्णींचा गौरवोद्गार

Manchar Crime : मंचरमध्ये तरुणीला कालव्यात ढकलण्याची धक्कादायक घटना; आरोपी तरुण अटकेत, एनडीआरएफकडून तीव्र शोधमोहीम

SCROLL FOR NEXT