Kapil Sharma and trishan 
मनोरंजन

Photo Viral: कपिल शर्माच्या 'त्रिशानचा' पहिला 'बर्थ डे'

टीव्ही मनोरंजन (Tv Entertainment) विश्वामध्ये सर्वाधिक लोकप्रिय असणारी मालिका म्हणून द कपिल शर्मा शो (The Kapil Sharma Show) चे नाव घ्यावे लागेल.

सकाळ डिजिटल टीम

Kapil Sharma Son Trishan Birthday: टीव्ही मनोरंजन (Tv Entertainment) विश्वामध्ये सर्वाधिक लोकप्रिय असणारी मालिका म्हणून द कपिल शर्मा शो (The Kapil Sharma Show) चे नाव घ्यावे लागेल. कपिल शर्माने (Kapil Sharma) गेल्या काही वर्षांपासून या मालिकेला लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन ठेवले आहे. कोरोनाच्या काळात देखील या मालिकेचा टीआरपी सर्वाधिक होता. त्याचं चित्रिकरण बंद होते. मात्र जुनेच एपिसोड पुन्हा टेलिकास्ट करुन त्याची लोकप्रियता मिळवण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला होता. त्यामुळे कपिल शर्माची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढल्याचे दिसून आले आहे.

आता कपिल शर्मा सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. त्याचे कारण त्याच्या मुलाचा त्रिशानचा जन्मदिन. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसादही मिळाला आहे. त्रिशानला मनोरंजन क्षेत्रातील मान्यवरांपैकी बॉलीवूडच्या काही सेलिब्रेटींनी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यात टायगर श्रॉफचा समावेश करावा लागेल. गेल्यावर्षी फेब्रुवारी 2021 मध्ये त्रिशानचा जन्म झाला होता. आज त्याचा पहिला जन्मदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. त्याचे काही फोटो कपिलनं सोशल मीडियावरुन शेयर केले आहेत. त्यानिमित्तानं कपिलनं त्या फोटोंना एक कॅप्शनही लिहिली आहे. त्या कॅप्शनवरुन काही सेलिब्रेटींनी प्रतिक्रिया दिली आहे.

इंस्टावरुन शेयर केलेल्या त्या फोटोंमध्ये त्रिशान हा गॉगल लावून बसला आहे. त्यानं एक सुंदर टी शर्टही परिधान केलं आहे. त्यामध्ये तो कमालीचा क्युट दिसतो आहे. त्यावरुन चाहत्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. कपिलनं इंस्टावर लिहिलं आहे की, आज माझा मुलगा त्रिशानचा पहिला जन्मदिन आहे. त्याला तुम्हा सगळ्यांचा आशीर्वाद आणि शुभेच्छा हव्या आहेत. माझ्या मुलाला जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आमच्या आयुष्यात येऊन तो प्रवास आणखी सुंदर केल्याबद्दल आम्ही त्या देवाचे आभारी आहोत. अशी भावना कपिलनं यावेळी व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Development Plan : गणपतीपुळेचा विकास आराखडा 7 वर्षांपासून कागदावरच! पालकमंत्री उदय सामंतांच्या बैठकीत काय निर्णय होणार?

Dhairyasheel Mane, Ashokrao Mane : खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव मानेंना पंचगंगा प्रदूषण आमंत्रणचं नाही; चिडलेले आमदार माने काय म्हणाले

Kurla News: उलट्या, जुलाब, ताप आणि चक्कर..., कुर्ल्यात मोमोज खाल्ल्यानंतर १६ जणांना विषबाधा

GATE 2027 Registration: आजपासून नोंदणी सुरू; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा आणि परिक्षेची फी

Marathi News Live Updates : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनस्थळी नेहा बोरा दाखल, विद्यार्थ्यांशी संवाद साधत जाणून घेतले प्रश्न

SCROLL FOR NEXT