kapil sharma sunil grover work together in upcoming netflix comedy show  SAKAL
मनोरंजन

Kapil Sharma - Sunil Grover: वाह वाह! कपिल शर्मा - सुनिल ग्रोव्हर पुन्हा एकत्र! या आगामी शोमध्ये पुन्हा दिसणार कॉमेडीचा जलवा

कपिल - सुनील एकत्र आल्याने त्यांच्या चाहत्यांच्या आनंदाला उधाण आलंय

Devendra Jadhav

कपिल शर्मा - सुनील ग्रोव्हरच्या कॉमेडीने एक काळ गाजवलाय. कॉमेडी नाईट्स विथ कपिल, कपिल शर्मा शोमधून सुनील ग्रोव्हर - कपिल शर्माच्या कॉमेडीची जुगलबंदी पुन्हा दिसली. नंतर काही मतभेद आणि भांडणांमुळे कपिल - सुनील यांनी एकमेकांसोबत काम केलं नाही.

पण आता या दोघांच्या फॅन्ससाठी खुशखबर. कपिल - सुनील हे आगामी शोमधून पुन्हा एकत्र येणार आहेत. दोघांचा एकत्र सेल्फी व्हायरल झाला असुन त्यांच्या फॅन्सना आनंद झालाय.

(kapil sharma sunil grover work together in upcoming netflix comedy show)

नेटफ्लिक्सने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये, कपिलने त्याच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिलाय! नेटफ्लिक्सवरील आगामी कॉमेडी शोसाठी सुनील ग्रोव्हर कपिलसोबत पुन्हा एकत्र येणार आहे! होय तुम्ही ते बरोबर ऐकले आहे. कपिलच्या व्हिडीओमध्ये सुरुवातीला कपिलसोबत सुनिल ग्रोव्हर दिसतो. नंतर अर्चना सिंग, कृष्णा अभिषेक असे सर्व कलाकार दिसतात. या व्हिडीओच्या शेवटी, "आता आमचं कुटुंब पूर्ण झालं."

Netflix वरील आगामी कॉमेडी शोसाठी कपिल त्याच्या गँगसोबत पुन्हा एकदा लोकांना हसवसाठी सज्ज झालाय. तब्बल १३० देशांमध्ये ही कॉमेडी गँग परफॉर्म करणार असं दिसतंय.

कपिल - सुनीलच्या जोडीला एकत्र पाहून त्यांच्या फॅन्सना आनंद झालाय. आता हे दोघे एकत्र आल्यामुळे कॉमेडीचा धुमाकुळ होणार यात शंका नाही.

कपिलने यापुर्वी नेटफ्लिक्सवर Im not Done Yet हा स्टँडअप कॉमेडी शो केला होता. या शोला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आता कपिलचा नवीन शो सुद्धा नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.

पहिल्यांदाच कपिल वेगळ्या प्रकारे प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्याच्या या शो मध्ये कृष्णा अभिषेक, कीकू शारदा, राजीव ठाकूर, अर्चना पुरन सिंग, आणि सुनील ग्रोव्हर हे देखील सहभागी होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Maharashtra Latest News Update: राज्यासह देशात आज दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT