Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Team in Kapil Sharma Show Esakal
मनोरंजन

Kapil Sharma सर्वांसमोर पूजा हेगडेला म्हणाला,'ऑरेंज कुल्फी..',यावर सलमानची कमेंट ऐकून अभिनेत्री लाजेनं लालबूंद..

'किसी का भाई किसी की जान' सिनेमाची टीम कपिल शर्मा शो मध्ये उपस्थित राहिली होती. तेव्हाचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.

प्रणाली मोरे

Kapil Sharma Show Viral VIdeo: सलमान खान सध्या त्याचा आगामी 'किसी का भाई किसी की जान' सिनेमामुळे जोरदार चर्चेत आहे. सलमान सध्या आपल्या टीमसोबत याचे प्रमोशन करताना दिसत आहे. नुकताच सलमान आपल्या या टीमला सोबत घेऊन कपिल शर्मा शो मध्ये गेला होता.

शो मध्ये सलमान खानने अभिनेत्री पूजा हेगडेसोबत एन्ट्री केली होती. यादरम्यान भाईजान हाफ ग्रे शर्ट आणि जीन्समध्ये दिसला होता. तर पूजा हेगडेनं पूर्ण ऑरेंज रंगाचा गाऊन घातला होता.

अशामध्ये कपिल शर्मानं अभिनेत्रीच्या ड्रेसची खिल्ली उडवली तेव्हा सलमान खाननं अशी गोष्ट बोलून दाखवली की ज्यामुळे अभिनेत्याचे चाहते हैराण होतील हे नक्की.(Kapil Sharma told pooja hegde orange kulfi than actress turned after hearing such an answer from salman khan)

'द कपिल शर्मा' शो संबंधित एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये पूजा हेगडे संपूर्ण ऑरेंज रंगाच्या ड्रेसमध्ये पाहिल्यानंतर कपिल शर्मा म्हणताना दिसतोय की,''जेव्हा आम्ही शाळेत होतो तेव्हा एक ऑरेंज रंगाची कुल्फी यायची. मी शप्पथ घेऊन सांगतो मला तुला पाहिल्यावर समोर ती ऑरेंज कुल्फीच दिसली''.

कपिल शर्माच्या या वक्तव्यावर सलमान खान हसत हसत म्हणतो,''मी खूप खाल्लीय ती कुल्फी. आतापर्यंत माझा आवाज बसलाय तो त्या कुल्फीमुळेच''. सलमान खानचं हे वक्तव्य ऐकून पूजा हेगडे मात्र खूपच लाजताना दिसते आहे.

सोशल मीडियावर 'द कपिल शर्मा शो' मधील एक मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. सलमानच्या 'किसी का भाई किसी की जान' सिनेमाची टीम या शो मध्ये पोहोचली होती तेव्हाचा हा व्हिडीओ आहे.

सलमान खान,पूजा हेगडे आणि कपिल शर्मामध्ये हा किस्सा घडलेला आहे. यांच्या चाहत्यांना हा व्हिडीओ भलताच आवडला आहे. लोक या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव करताना दिसत आहेत.

'किसी का भाई किसी की जान'सिनेमात सलमान खानसोबत पूजा हेगडे,जगपति बाबू, भूमिरा चावला,विजेंदर सिंग,अभिमन्यु सिंग, राघव जुयाल,सिद्धार्थ निगन,जस्सी गिल, शहनाझ गिल,पलक तिवारी आणि विनाली भटनागर मुख्य भूमिकेत आहेत. हा सिनेमा २१ एप्रिल रोजी रिलीज होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT