Kapil Sharma Daughter Ramp Walk Esakal
मनोरंजन

Kapil Sharma Daughter Ramp Walk : कपिलच्या लेकीची भारतीच्या गोलाला टक्कर! आतापासून त्यानं...

Vaishali Patil

Kapil Sharma Daughter Ramp Walk: कॉमेडियन आणि अभिनेता कपिल शर्मा याला काही वेगळ्या ओळखीची गरज नाही. तो खूप लोकप्रिय आहे. कॉमेडी नाईट विथ कपिल शर्मा या शोने तर त्याला घराघरात प्रसिद्धी दिली आहे. तो लोकांना खूप हसवतो. कॉमेडी व्यतिरिक्त कपिलने अनेक चित्रपटांमध्येही अभिनय केला आहे.

कपिल नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत आहेच. मात्र आज तो त्याच्या एका व्हिडिओमुळे चर्चेत आहे. कपिलनं एका कार्यक्रमात आपल्या लाडक्या मुलीसोबत रॅम्प वॉक केला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

कपिल नुकताच चॅरिटीशी संबंधित एका फॅशन इव्हेंटमध्ये सहभागी झाला होता. यामध्ये तो त्याच्या कुटुंबासोबत दिसत होता. यादरम्यान तो मुलगी अनायरा शर्मासोबत रॅम्प वॉक करताना दिसला .

याचवेळी त्या इव्हेंटमध्ये भारती सिंह आणि तिचा मुलगा गोलाही दिसला. पहिले कपिल शर्मा त्याच्या मुलीसोबत आणि नंतर भारती तिच्या लेकासोबत दिसली. दोघांनी रॅम्प वॉक केला.

कपिल त्याच्या 3 वर्षाच्या मुलीचा हात धरून रॅम्पवर उतरला. यावेळी दोघांनी काळे कपडे घातले होते. बाप-लेकीची जोडी रॅम्पवर खूप सुंदर दिसत होती. त्यात जेव्हा कपिलने सांगितल्यावर अनायराने फ्लाइंग किस दिले तेव्हा सर्वांनी एकच गोंधळ केला.

तर नंतर कॉमेडियन भारती सिंग देखील तिचा मुलगा गोलासोबत रॅम्प वॉक करताना दिसली. मात्र, यावेळी भारतीसोबत कृष्णा अभिषेक गोलाला रॅम्पवर घेऊन जाताना दिसला. भारती आणि तिचा मुलगा गोलाचा रॅम्प वॉकचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला.

या कार्यक्रमाचं नाव बेटी फॅशन शो असं आहे. जे दरवर्षी होत असतो. यावेळी हा शो मदर्स डे निमित्त आयोजित करण्यात आला होता. जगभरातील महिलांवरील गुन्ह्यांबद्दल लोकांना सावध करणे हा त्याचा मुख्य उद्देश होता. याची संस्थापक बॉलीवूड निर्माती अनु रंजन आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Forecast : महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी, पण ‘या’ भागांत मुसळधार सरी कोसळणार; आज तुमच्या जिल्ह्यांत कसे असेल हवामान? जाणून घ्या

Narendra Modi Foreign Tours: सात महिन्यांत ७४.५९ कोटी खर्च! पंतप्रधान मोदींच्या विदेश दौऱ्यांची आकडेवारी जाहीर, राज्यसभेत खुलासा

Indian Fishing Boat: भारतीय बोटीला अपघात; ११ मच्छीमारांना श्रीलंकेच्या नौदलाने वाचवले, खवळलेल्या समुद्रात मध्यरात्री अनुभवला थरार..

तर काय ?

Maratha Reservation: मनोज जरांगे कुणाच्या अजेंड्यावर काम करत होते? लक्ष्मण हाके यांचा खळबळजनक आरोप, संविधानाला आव्हान देऊ नका

SCROLL FOR NEXT