Karan Deol-Drisha Acharya's pre-festivities begin Sunny Deol flaunts his unique mehendi photo viral  Esakal
मनोरंजन

Karan Deol Wedding: धर्मावरुन वाद सुरु असतांनाच पोराच्या लग्नात सनीच्या मेहंदीनं वेधलं लक्ष!

Vaishali Patil

Sunny Deol Mehendi: बॉलिवूड अभिनेता सनी देओलच्या घरात लवकरच सनई वाजणार आहे. सनी देओलचा लाडका लेक करण देओल 18 जून रोजी त्याची गर्लफ्रेंड द्रिशा आचार्यसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. करण आणि द्रिशाच्या लग्नाचे प्री-वेडिंग सेलिब्रेशन जोरात सुरू आहे.

करण देओल आणि द्रिशा आचार्य यांचा हळदी समारंभ देखील नुकताच पार पडलाज्याचे फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले.

रोका आणि हळदी सोहळ्यातील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतांनाच काल रात्री करण देओल मेहेंदी सोहळ्यानंतर ते मिडियासमोरही आले यावेळी दोघांनीही त्यांची मेहंदी मिडियाला दाखवली.

त्याचबरोबर होणाऱ्या नवरदेवाचे वडिल म्हणजेच सनी देओलच्या मेंहदीनं देखील सर्वांच लक्ष वेधलं. इतकच नाही तर ती मेंहदी पाहिल्यानंतर सनीनं पुन्हा सर्वांच मन जिंकलं.

व्हायरल होत असलेल्या दुसर्‍या व्हिडिओत सनी देओल एंट्री गेटवर पापाराझींना अभिवादन करताना दिसला. यावेळी त्याने मेंहदी लावलेला हातही दाखवला.

सनी देओलच्या हातावर मेंहदीची डिझाइन नव्हे तर प्रत्येक धर्मांची चिन्ह काढण्यात आली होती. या मेंहदीद्वारे त्याने सांगतिले की तो प्रत्येक धर्माचा किती आदर आहे. अभिनेत्याच्या लूकबद्दल बोलायचे तर तो पांढर्‍या पँटसह पेस्टल गुलाबी रंगाचा शर्ट परिधान केलेला दिसला.

करण देओल आणि द्रिशाचे प्री-वेडिंग सेलिब्रेशन 15 ते 17 जून रोजी होणार असून १८ जून रोजी त्यांचे लग्न होणार आहे. करण देओल आणि द्रिशा आचार्य गेल्या 6 वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत.

द्रिषा आचार्य ही प्रसिद्ध चित्रपट निर्माते बिमल रॉय यांची नात आहे. करण देओल आणि द्रिशा आचार्य यांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये धर्मेंद्र आणि प्रकाश कौर यांच्या लग्नाच्या वाढदिवसाला एंगेजमेंट केली होती. अशा परिस्थितीत 6 वर्षांच्या डेटिंगनंतर दोघेही अखेर 18 जून रोजी लग्न करणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Saif Ali Khan : सैफ अली खानला मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिला मोठा धक्का!

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT