karan johar birthday sakal
मनोरंजन

करण जोहरचा पन्नासावा वाढदिवस, 'हे' आहेत त्याचे धक्कादायक महागडे शौक...

दिग्दर्शक करण जोहर कडे आज कोटींवधीची संपत्ती असून जगातल्या या महागड्या वस्तु त्याच्या घरात आहेत.

नीलेश अडसूळ

Karan johar birthday : कुछ कुछ होता है, कभी खुशी कभी गम, कभी अलविदा ना कहना जे चित्रपट प्रदर्शित होऊन आज बरिच वर्षे झाली. पण अजूनही या चित्रपटांची किमया कमी झालेली नाही. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर गल्ला केलाच शिवाय आजही जे चित्रपट टेलिव्हिजनवर आवर्जून पाहिले जातात. कारण ही जादू आहे करण जोहरच्या (karan johar) दिग्दर्शनाची. प्रेम, वात्सल्य आणि रोमान्स याचा पुरेपूर वापर करून त्याने तयार केलेले रंजक सिनेमे प्रेक्षकांना आजही भुरळ घालतात. त्याच करणचा आज पन्नासावा वाढदिवस.. आज कोट्यधीश असलेल्या या दिग्दर्शकाला काही अत्यंत महागडे शौक आहेत. (karan johar birthday) (karan johar expensive hobbies)

मालिका विश्वातून आपल्या करियरची सुरवात करणाऱ्या करणने पुढे 'दिल वाले दुल्हनिया ले जायेंगे' (DDLJ) या चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शन केले. पुढे त्याने 'कुछ कुछ होता है' (KUCH KUCH HOTA HAI) सारखा हिट सिनेमा त्याने दिला आणि त्याच्या करियरची दिशाच बदलून गेली. पुढे करणने 'कभी खुशी कभी गम', 'कभी अलविदा न कहना, 'माय नेम इज खान, 'स्टुडंट ऑफ द इअर, 'बॉम्बे टॉकिज', 'ए दिल है मुश्किल', 'लस्ट स्टोरीज' सारख्या अनेक गाजलेल्या सिनेमांचं दिग्दर्शन आणि निर्मिती केली. लवकरच त्याचा 'जुग जुग जिओ' हा चित्रपट रिलीज होणार आहे. त्याच्या कामाने त्याने बॉलीवुडमध्ये भक्कम पाय रोवले आहेत.

याच क्षेत्रातून आज करणने कोट्यवधी रुपये कमावले. मुंबई सारख्या ठिकाणी अलिशान बंगला, सर्व सुखसुविधा, गाड्या सर्व काही करणकडे आहे. असं म्हंटलं जातं ही करणकडे २००० कोटींहून अधिकची संपत्ती आहे. त्यामुळे तो काही महागडे शौकही आवर्जून करतो. करणला महागड्या गाड्यांचा शौक आहे. त्याच्याकडे असलेल्या गाड्यांच्या ताफ्यामध्ये जॅग्वार, मर्सिडिज, एस ५६०, बीएमडब्ल्यू यांसारख्या गाड्या आहेत. करणला केवळ गाड्यांचा नाही तर विविध प्रकारच्या बुटांचाही शौक आहे. जगातील बहुतांशी महागड्या ब्रॅंडचे बूट त्याच्या रोजच्या वापरत आहेत. यामध्ये Louis, Vuitton, Stella, Mccartney, Donatella, Versace असे दर्जेदार आंतरराष्ट्रीय ब्रँडचे बूट करण वापरतो. युनिक आणि महागड्या गोष्टी स्वतःकडे बाळगण्याच्या या सवयीमुळेच करणची प्रत्येक गोष्ट लोकांच्या नजारा रोखून ठेवणारी असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pavagadh Ropeway Accident: गुजरातमधील पावगढ शक्तिपीठ येथे मोठी दुर्घटना; रोपवे तुटल्याने सहा जणांचा मृत्यू

भक्तीपासून ते व्यापारापर्यंत... गणपती विसर्जन अर्थव्यवस्थेचे आर्थिक इंजिन कसे बनते? वाचा ₹४५,००० कोटींच्या अर्थप्रवाहाची जादू!

Ganpati Visarjan 2025 Live Updates : डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून जुहू चौपाटीवर निर्माल्य गोळा करण्याचे काम

ED action on Sahara Group : सहारा ग्रुपवर 'ED'ची मोठी कारवाई; कोट्यवधींच्या घोटाळ्यात आरोपपत्र दाखल

Latest Maharashtra News Updates : 'बिडी-बिहार' वादात केरळ काँग्रेसने आपली चूक मान्य केली

SCROLL FOR NEXT