karan johar birthday wish to salman khan and announced kuch kuch hota hai 2  SAKAL
मनोरंजन

Salman Khan Birthday: 'कुछ कुछ होता है 2' येणार? सलमानच्या वाढदिवशी करण जोहरची घोषणा!

भाईजानच्या वाढदिवशी करणने नकळत एक मोठी घोषणा केलीय

Devendra Jadhav

Karan Johar on Salman Khan Birthday: सलमान खानच आज वाढदिवस. सलमानचे सिनेमे पाहण्यासाठी चाहते सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात. भाईजानला आज अनेक लोकं शुभेच्छा देत आहेत.

भाईजानला शुभेच्छा देताना दिग्दर्शक - निर्माता करण जोहरने एक खास पोस्ट लिहिली आहे. करणने शुभेच्छा देताना नकळत कुछ कुछ होता है 2 ची घोषणा केलीय.

करण जोहर लिहीतो, "२५ वर्षांपूर्वी मी एका पार्टीत काहीसा गोंधळलो होतो…. एक मोठा चित्रपट स्टार माझ्याकडे आला आणि मला विचारले की, मी असा कोपऱ्यात का उभा आहे?... मी त्याला सांगितले की, मी आगामी सिनेमातील एका भागासाठी अनेक अभिनेत्यांकडे गेलो होतो परंतु सर्वांनी नम्रपणे नकार दिला... या सुपरस्टारच्या बहीणीशी माझे चांगले संबंध होते. म्हणून त्या सुपरस्टारने दुसऱ्या दिवशी सिनेमाची गोष्ट ऐकण्यासाठी मला भेटायला बोलावलं. माझ्या स्वप्नांमध्ये सुद्धा मी या सुपरस्टारला माझी स्क्रीप्ट ऐकवेल याची कल्पनाही केली नव्हती.."

मी माझ्या मनात प्रार्थना आणि चमत्काराची तीव्र इच्छा घेऊन त्या सुपरस्टारला पहिला भाग ऐकवला..

करण जोहर पुढे लिहीतो, "मी जेव्हा मध्यंतरापर्यंत त्याला स्क्रीप्ट ऐकवली तेव्हा त्याने माझ्याकडे पाहिले (तोपर्यंत मला सहारा वाळवंटातल्या तहानलेल्या व्यक्तीसारखे वाटले. आणि मला पाण्याची गरज होती) त्याने प्रेमळपणे मला पाणी दिले आणि म्हणाला “मी तयार आहे सिनेमात काम करायला!!! " मी गोंधळून गेलो आणि म्हणालो की,"पण तू या सिनेमात इंटरव्हलनंतर आहेस."

यावर तो म्हणाला “माझं तुझ्या वडिलांवर प्रेम आहे आणि मी हा चित्रपट केला नाही तर माझी बहीण माझा जीवच घेईल” आणि मग हा सुपरस्टार म्हणजेच सलमान खानची KKHH (कुछ कुछ होता है) मध्ये एन्ट्री झाली…."

करण शेवटी लिहीतो, "माझ्या पहिल्या चित्रपटात माझ्याकडे परिपूर्ण अमन म्हणजेच सलमान खान आहेत. सलमानसोबत काम करण्याची संधी दिल्याबद्दल मी त्याची बहिण अलविरा आणि माझ्या वडिलांचा मनापासून आभारी आहे!

अशा माणुसकीच्या कथा आज घडत नाहीत! सलमानला वाढदिवसाच्या शुभेच्छा! तुझ्याबद्दल नेहमीच खूप प्रेम आणि आदर आहे … तसेच 25 वर्षांनंतर आम्हाला पुन्हा एक कथा सांगायची आहे… सध्या यापेक्षा जास्त काही सांगणार नाही .. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.."

आता कुछ कुछ होता है 2 ची येत्या काही दिवसात घोषणा झाली तर आश्चर्य वाटायला नको.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Latest Maharashtra News Updates : आम्ही एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT