Karan Johar is charging a whopping 8-figure amount for hosting Koffee With Karan 7. Google
मनोरंजन

Koffee with Karan: करण गेस्टला देतो फक्त हॅम्पर,स्वतः घेतो आठ अंकी रक्कम

Koffee with Karan 7 हा नवा सिझन ७ जुलैपासून सुरू झाला आहे.यावेळी गेस्टपेक्षा करणच्या मानधनाची चर्चा रंगली आहे.

प्रणाली मोरे

'कॉफी विथ करण'च्या(Koffee with karan 7) सातव्या सिझनची लोकं खूप उत्सुकतेने वाट पाहत होती. अखेर ७जुलै रोजी लोकांची प्रतिक्षा संपून अन् 7 व्या सिझनचा पहिला भाग रिलीज झाला. पहिल्या भागात आलिया भट्ट(Alia Bhatt) आणि रणवीर सिंग यांनी आपल्या मैत्रीपासून ते पर्सनल लाइफविषयी अनेक खुलासे केले आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आलियाने आपल्या लग्नाविषयी अनेक माहित नसलेल्या गोष्टी चाहत्यांना सांगितल्या. त्यामुळे अर्थातच पहिल्या भागापासून शो भरपूर चर्चेत आला.(Karan Johar is charging a whopping 8-figure amount for hosting Koffee With Karan 7)

यावेळचा सातवा सिझन खूपच स्पेशल होणार आहे. ज्याचं कारण आहे शो मध्ये येणारे बडे स्टार्स. यावेळी जान्हवी कपूरसोबत सारा अली खान येणार आहे, तर विजय देवराकोंडासोबत अनन्या पांडे 'लाइगर' सिनेमासंदर्भातील अनेक एक्सक्लुसिव्ह गोष्टी शेअर करतील. तर साऊथ स्टार समंथा रुथ प्रभू बॉलीवूड खिलाडी अक्षय कुमार सोबत येण्याची शक्यता आहे. शो मध्ये ती पहिल्यांदाच आपल्या घटस्फोटाविषयी बोलताना दिसेल. गेस्ट आणि त्यांना विचारले जाणारे चटपटीत प्रश्न यामुळे करणचा 'कॉफी विथ करण' हा शो चर्चेत आहेच पण याहीपेक्षा करणला मिळणाऱ्या मानधनामुळेही शो चर्चेत आला आहे.

मीडियानं दिलेल्या वृत्तानुसार करण जोहर या शो चं होस्टिंग करण्यासाठी परफेक्ट होस्ट आहे आणि यासाठी तो भारीभरकम रक्कम वसूल करत आहे. करण शो मध्ये आलेल्या गेस्टना कॉफी आणि हॅम्पर देऊन मार्गी लावतो तर स्वतः मात्र एका एपिसोडसाठी 2 करोड घेत आहे. यावेळी तो 20 ते 22 एपिसोड करत आहे. म्हणजे लक्षात आलं असेल आपल्या की यावेळी 'कॉफी विथ करण'च्या 7 व्या सिझनमधून करण तब्बल 40 ते 44 करोडची मोठी रक्कम आपल्या खिशात घालणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad Crime: कऱ्हाडला ड्रग्जप्रकरणी तिघांना अटक; पावणेतीन लाखांचे एमडी जप्त, २५ लाखांचा अन्य ऐवजही ताब्यात

Washing Machine Tips : क्षमतेपेक्षा जास्त कपडे भरल्यास खराब होऊ शकते वॉशिंग मशीन; एका वेळी किती कपडे धुवावेत? जाणून घ्या

Pune weather: जूनच्या स्वागताला पावसाची चाहूल; पुण्यात मेघगर्जना आणि विजांचा इशारा, नैऋत्य मोसमी पावसाची प्रगती

IPL 2026: RR चा फक्त १ कोटीचा जुगार; १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने ३३.८७ कोटींचा नफा कसा कमावला? पाहा संपूर्ण गणित

Ahilyanagar Crime: अहिल्यानगरात थरारक घटना; मुरुम चोरी उघडकीस आणणाऱ्या तरुणांचा पाठलाग जीवावर बेतला, जेसीबीच्या धडकेत एकाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT