Karan Johar New Show On Nepotism  Esakal
मनोरंजन

Karan Johar: आता मजा येणार! कंगनाचं तोंड बंद करायला करण आणतोय नेपोटिझमवर शो...

Vaishali Patil

Karan Johar New Show On Nepotism: बॉलिवूड अन् नेपोटिझमच नातं हे खुपच जूनं आहे. बॉलिवूडमध्ये चांगल्या कलाकारांना डावलून नेपो बेबीजला प्राधान्य दिले जाते. असा आरोप बऱ्याचदा केला जातो.

हे आरोप करण्यात बॉलिवूडची पंगा क्विन कंगना राणैत हिच नाव पहिले येतं. ती बॉलिवूडच्या या टोळीला माफिया गँग म्हणत असते. त्याच्यावर टिका करण्याची एकही संधी ती सोडत नसते.

निर्माता करण जोहरला या मुद्द्यावरून अनेकवेळा घेरले गेले आहे. करणला नेपोकिंगही म्हटलं जाते. याची जास्त चर्चा तेव्हा झाली जेव्हा 2017 मध्ये जेव्हा कंगना रणौत करण जोहरच्या शोमध्ये पोहोचली होती.

तिने तेव्हा करण जोहरवर घराणेशाहीचा आरोप केला, तेव्हापासून हा शब्द अधिक चर्चेत आला.

आता रिपोर्ट्सनुसार, करण जोहर स्वतः यावर एक शो घेऊन येत आहे, जो घराणेशाहीवर आधारित असेल. करणच्या या कार्यक्रमाच नाव असेल 'शोटाईम'

करणच्या 'शोटाईम' या शोबद्दल त्याने नाही तर डिस्ने प्लस हॉटस्टारचे कंटेंट हेड गौरव बॅनर्जी यांनी ही माहिती दिली आहे.

काजोलच्या 'द ट्रायल' या वेबसिरीजच्या पत्रकार परिषदेत सुरु होती त्यावेळी गौरवने ही माहिती प्रेक्षकांना दिली.

डिस्नेवर नवीन काय येणार आहे ते त्याने सांगितले. यासोबतच त्याने सांगितले की, करण जोहर शोटाइम नावाचा शो आणणार आहे, तो बॉलीवूडच्या घराणेशाहीवर आधारित असेल.

या विषयी अधिक माहिती देतांना गौरव म्हणाला, “अनेक अद्भुत गोष्टी आहेत. पहिले नाइट मैनेजरचा समारोप होईल.

त्यानंतर काजोलचा मित्र करण जोहरच्या कॉफी विथ करणचा नवा सीझन येणार आहे. यासाठी तो लवकरच शूटिंगलाही सुरुवात करणार आहे.

तो आमच्यासाठी आणखी एक मनोरंजक शो 'शोटाइम' बनवणार आहे, जो बॉलिवूडमधील नेपोटिझमवर आधारित असेल.

शोटाइमची घोषणा गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये करण्यात आली होती. गेल्या वर्षी करण जोहरने ही घोषणा केली होती, “माझ्या आवडत्या शोच्या कॉफी विद करणच्या आणखी एका रोमांचक सिझनव्यतिरिक्त, शोटाइम हा शो जाहीर करत आहे. असं करणने सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सिनेसृष्टीला धक्का! 'वेलकम' फेम अभिनेत्याचं वयाच्या ५६व्या वर्षी निधन; 15 दिवसांपासून होते इस्पितळात

Nagpur News : आई-बाबा मला माफ करा; तरुण अधिवक्‍त्याने गळफास घेऊन संपविले जीवन

Empress Garden : एम्प्रेस गार्डनच्या जागेवर न्यायालयीन बांधकामास विरोध; १३४ वर्षांचा ऐतिहासिक वारसा उद्ध्वस्त करण्याचा डाव

Gyanesh Kumar Impeachment : मुख्य निवडणूक आयुक्तांवर महाभियोग चालवण्याची तयारी! ज्ञानेश कुमार यांच्या अडचणीत वाढ? विरोधी पक्ष संसदेत मांडणार प्रस्ताव!

IND vs WI, Live Streaming: भारत-वेस्ट इंडिज संघात ३ वनडे अन् ५ टी२० सामन्यांचा रोमांच! कधी, कुठे अन् किती वाजता पाहाणार मॅच?

SCROLL FOR NEXT