karan sushant 
मनोरंजन

सुशांत आत्महत्या प्रकरणात 'या' कारणामुळे होणार करण जोहरची चौकशी

दिपालीराणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येचं गुढ दिवसेंदिवस वाढतंच चाललं आहे. या प्रकरणात नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. बॉलीवूडमधल्या अनेक लोकांची चौकशी झाल्यानंतर आता निर्माता करण जोहरची चौकशी होणार आहे. या आठवड्यात कधीही करण जोहरची चौकशी होऊ शकते. करणच्या धर्मा प्रोडक्शनचे सीईओ अपूर्व मेहता यांची आज मंगळवारी चौकशी होणार आहे. याआधी करणची मॅनेजर रेश्मा शेट्टीची देखील चौकशी झाली होती.

धर्मा प्रोडक्शन आणि सुशांतमध्ये 'ड्राईव्ह' सिनेमाच्या झालेल्या कराराची कॉपी देखील पोलिसांनी मागितली आहे, पोलिसांच्या तपासात ही गोष्ट समोर आली आहे की ड्राईव्ह या सिनेमामुळे सुशांत आणि धर्मा प्रोडक्शनमध्ये काहीतरी मतभेद झाले होते. स्वतः सुशांतची एक्स मॅनेजर श्रुती मोदीने पोलिसांच्या चौकशीमध्ये करण जोहर आणि सुशांतमध्ये झालेल्या एका प्रोजेक्टविषयीची ही महत्वाची माहिती दिली आहे.

श्रुतीच्या म्हणण्यानुसार सुशांतने करणच्या 'ड्राईव्ह' या सिनेमात काम केलं होतं.सुशांतने या सिनेमाच्या डबिंगसाठी तारख्या दिल्या नव्हत्या. यावर जेव्हा श्रुतीने सुशांतला विचारलं होतं तेव्हा सुशांत म्हणाला होता की मी तीनवेळा डबिंगसाठी तारखा दिल्या होत्या मात्र यांनी काहीच केलं नाही. आता पोलिस याचा तपास करत आहेत की या सिनेमामुळे सुशांत आणि करणच्या धर्मा प्रोडक्शनमध्ये काही मतभेद झाले होते का?

याशिवाय सोशल मिडियावर सतत अशी चर्चा सुरु आहे की 'ड्राईव्ह' हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज केल्यामुळे धर्मा प्रोडक्शनच्या या निर्णयावर सुशांत नाराज होता. सोबतंच असं देखील म्हटलं जातंय की हा सिनेमा हवा तसा मेहनत घेऊन बनवला गेला नव्हता आणि नाही याचं प्रमोशन हवं तसं झालं होतं. मात्र सुशांतला या सिनेमाकडून खूप अपेक्षा होत्या. 

पोलिसांना याच्याशीच संबंधित काही गोष्टींचा तपास करायचा आहे की खरंच हा सिनेमा बनण्याच्या आधी ओटीटीवर रिलीज करण्याचं ठरलं होतं की नंतर हा निर्णय बदलला गेला? याच प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी पोलिसांनी धर्मा प्रोडक्शन आणि सुशांतमध्ये या सिनेमाच्यावेळी झालेल्या कराराची कॉपी तपासासाठी मागवली आहे.

karan johar summoned in sushant singh rajput case

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT