Karana Johar Google
मनोरंजन

'नाहीतर ते मला मारुन टाकेल...' करण जोहरचं धक्कादायक वक्तव्य

आपल्या सिनेमांच्या माध्यमातून नेहमीच आनंद देणाऱ्या करण जोहरला कोणतं दुःख बोचतंय यावरनं त्याचे चाहते मात्र चिंतेत आहेत.

प्रणाली मोरे

बॉलीवूडचा दिग्गज निर्माता-दिग्दर्शक करण जोहर(Karan Johar) हा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय पहायला मिळतो. तो त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील अनेक गोष्टी तिथे शेअर करीत असतो. सोशल मीडियाशी त्याचं एक वेगळंच नातं आहे. पण आता यात दुरावा येण्याची शक्यता आहे किंवा असं म्हणूया की तो दुरावा आला आहे. कारण एरव्ही करण जवळ-जवळ रोजच त्याच्या डे टू डे लाइफचा वृत्तांत मजेदार पद्धतीनं त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करताना दिसायचा. पण आता ते सगळं कमी झालं आहे. करणनं ठरवलं आहे आता तो सोशल मीडियावर फक्त त्याच्या कामाशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टीच सोशल मीडियावर शेअर करणार आहे.

करणला याविषयी जेव्हा एका मुलाखतीत विचारलं गेलं तेव्हा करणनं सांगितलं की आता तो केवळ त्याच्या सिनेमासंबंधित पोस्ट सोशल मीडियावर शेअर करणार आहे. माझ्यासाठी सोशल मीडिया हे माध्यम आता केवळ माझ्या कामाला जगापर्यंत पोहोचवण्याचं एक माध्यम असेल. आणि जे मी फक्त माझं एक काम समजून करेन. पुढे त्याविषयी अधिक स्पष्टिकरण देताना करण म्हणाला,''मी आता जेव्हा माझा सिनेमा पूर्ण होईल तेव्हा तो कधी प्रदर्शित होणार किंवा तो येत आहे याविषयी फक्त लोकांना मेसेज देण्यासाठी माझ्या पोस्ट सोशल मीडियावर शेअर करेन. यापुढे उगाचच माझ्या वैयक्तिक आयुष्यात काय सुरु आहे मग ते आनंद किंवा दुःख यापैकी कशावरही मी सोशल मीडियावर व्यक्त होणार नाही''.

करणनं त्या मुलाखतीत ट्रोलिंगला घेऊनही मोठं भाष्य केलं आहे. तो म्हणतो,''आता मी ट्रोलिंगचा फार विचार करत नाही,पण आधी मला या सगळयाचा खूप त्रास व्हायचा. मी आता फक्त अशाचं कमेंट वाचतो जिथे कमेंटबॉक्स मध्ये मला हार्ट इमोजी दिसेल. माझ्या सेक्शुअॅलिटीविषयी गलिच्छ भाषेत केलेली कमेंट किंवा त्यांना जे काही माझ्या विषयी वाटतं याचा विचार करण्यापेक्षा मी आता विचार करतोय की मे २०२२ मध्ये मी ५० वर्षांचा होईन आणि माझ्यासाठी ही खूप आनंदाची गोष्ट आहे''.

ट्रोलर्सना कळवळीची विनंती करत करण म्हणाला,'' माझं आयुष्य खूप साधं आहे. माझ्यावर प्रेम करा किंवा राग करा,पण मला उगाचच मी कुणीतरी वेगळा परग्रहावरचा माणूस आहे म्हणून कुत्सित नजरेनं माझ्याकडे पाहू नका,कारण ती वेगळी वागणूक मला मारुन टाकेल. मी ती वेगळी वागणूक सहन करू शकत नाही''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT