karan johar will host bigg boss instead of salman khan file image
मनोरंजन

Bigg Boss OTT: करण जोहर करणार सूत्रसंचालन

जाणून घ्या, नव्या सिझनमध्ये कोणकोणते नवीन बदल झाले?

प्रियांका कुलकर्णी

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध रिअ‍ॅलिटी शो बिग बॉसचा 15वा सिझन म्हणजेच 'बिग बॉस ओटीटी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या नव्या सिझनचा प्रीमियर हा टीव्हीवर होणार नसून तर ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार आहे. या शोच्या पहिल्या सहा आठवड्याचे एपिसोड्स हे ओटीटी प्लॅटफॉर्मवरून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. या शोचे सूत्रसंचालन गेले कित्येक सिझन बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (salman khan) करत होता. पण यावेळी मात्र त्याची जागा दुसऱ्या व्यक्तीने घेतली आहे. या नव्या सिझनचे ओटीटीवर प्रदर्शित होणाऱ्या भागाचे सूत्रसंचालन बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर (karan johar) करणार असून सलमान टिव्हीवर प्रदर्शित होणाऱ्या एपिसोड्सचे सूत्रसंचालन करणार आहे. करणच्या आधी बिग बॉस-13 चा विजेता सिद्धार्थ शुक्लाच्या (sidharth shukla) नावाचा सूत्रसंचालकसाठी विचार करण्यात आला होता. पण नंतर करणचे नाव निश्चित करण्यात आले. (karan johar will host bigg boss instead of salman khan)

नव्या सिझनमध्ये सामान्य लोकांना सहभाग घेण्याची संधी

काही दिवसांपूर्वी सलमानने शोचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला होता. या प्रोमोमध्ये सलमान नव्या सिझनबद्दल माहित देताना दिसला. या नव्या सिझनमध्ये सेलिब्रिटींसोबत सामान्य लोकही येणार आहेत. या लोकांची आणि सेलिब्रिटींची तगडी स्पर्धा प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.

‘बिग बॉस ओटीटी’ या बिग बॉसच्या नव्या सिझनबद्दल बोलताना सलमान म्हणाला होता की, 'हे चांगले आहे की, यावेळी बिग बॉस डिजिटली दाखवले जाईल. टीव्हीवर येण्याआधी 6 आठवडे व्हूटवर दिसतील. याद्वारे प्रेक्षकांचे केवळ मनोरंजनच होणार नाही, तर ते स्वतः सहभागी होऊन टास्कही देऊ शकतात. यावेळी प्रेक्षक देखील ‘बिग बॉस’ची भूमिका बजावू शकणार आहेत.व्हूटने काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते की, बिग बॉस ओटीटीचा प्रीमिअर होईल आणि चाहते 24 तासांमधून कधीही हा शो पाहू शकतात.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

BJP President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी महिलेला संधी? निर्मला सीतारामन यांच्यासह 'या' नावांची होतेय चर्चा

SCROLL FOR NEXT