Karanvir Bohra Esakal
मनोरंजन

Karanvir Bohra: सौभाग्यवती भव: 2 च्या सेटवर अभिनेत्याचा अपघात! मालिकेचे शुटिंग थांबवले

करणवीर बोहरा सौभाग्यवती भव 2 या शोच्या शूटिंगदरम्यान जखमी झाला.

Vaishali Patil

Saubhagyavati Bhava 2: अभिनेता करणवीर बोहरा लोकप्रिय टीव्ही अभिनेता आहे. त्याने अनेक मालिका आणि रिअॅलिटी शोमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आपल्या अभिनयाने त्याने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे.

सध्या तो सौभाग्यवती भव: 2 या शोमध्ये काम करत आहे. या शोमध्ये तो खलनायकाची भुमिका साकारत आहे. मात्र सौभाग्यवती भव: 2 मालिकेच्या शूटिंगदरम्यान करणवीर जखमी झाला आहे. या शोच्या शूटिंगदरम्यान त्याला गंभीर दुखापत झाल्याची बातमी समोर आली आहे.

रिपोर्टनुसार, यापूर्वी करणवीरच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली होती . मात्र आता अलीकडेच शूटिंगदरम्यान करणला त्याच गुडघ्याला दुखापत झाली आहे. गुडघ्याबरोबरच करणच्या कोपर आणि हातालाही काही जखमा झाल्या आहेत.

करणवीरच्या दुखापतीमुळे शोचे शूटिंग तात्काळ थांबवण्यात आले. करणला जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. करणवीरच्या अपघाताचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो शूटिंगदरम्यान जमिनीवर पडलेला दिसत आहे.

या बातमीनंतर त्याच्या चाहत्यांना करणची काळजी लागली होती. आता त्यातच करणवीरने चाहत्यांसोबत तब्येतीचे अपडेट शेअर केले आहे.

करणवीरने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेयर करत चाहत्यांचे आभार मानले आणि लिहिले, 'संदेशांबद्दल सर्वांचे आभार, काल सेटवर एक अपघात झाला, पण मी पुन्हा शूटिंग सुरू करत आहे.'

'सौभाग्यवती भव: 2' बद्दल बोलायचे झाले तर या मालिकेत करण विराजच्या भूमिकेत आहे. 2011 मध्ये आलेल्या सौभाग्यवती भव या लोकप्रिय मालिकेचा सिक्वेल आहे. आता या शोमध्ये धीरज धूपर मुख्य भूमिकेत आहे. हा शो OTT प्लॅटफॉर्मवर प्रसारित होत आहे. या शोचा पहिला एपिसोड 26 सप्टेंबरला रिलिज करण्यात आला होता.

करणवीर बोहराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर त्याने हम रहे ना रहे हम, बिग बॉस 12, नागिन 2, कुबूल है, ये है आशिकी, झलक दिखलाजा 6, लॉकअप, नच बलिए, शरारत, क्यूकी सास भी कभी बहू थी, कसौटी जिंदगी की, जस्ट मोहब्बत यांसारख्या सुपरहिट मालिका आणि शोमध्ये काम केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel Bans China Cars : इस्त्रायलमध्ये 'मेड इन चायना' वाहनांवर बंदी, ७०० कार जप्त; सरकारचा 'या' कारणामुळे मोठा निर्णय

अग्रलेख : चला उभारा शुभ्र शिडे ती..

जुबेर हंगरगेकरला आज पुन्हा न्यायालयात नेले जाणार! ‘वाहदते मुस्लिम- ए- हिंद’च्या सोलापुरातील पदाधिकाऱ्यास ‘ATS’ची नोटीस, कुंभारीजवळील शाळेतील कार्यक्रमाचे तेच होते आयोजक

फास्ट फूड ते फॅटी लिव्हर

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 4 नोव्हेंबर 2025

SCROLL FOR NEXT