Karanvir Bohra Reaches Out To Deepika Padukone:  Esakal
मनोरंजन

"मला Don 3 मध्ये काम हवंय" म्हणत पठ्याचा थेट दीपिकाला मॅसेज! तिनेही रिप्लाय देत सांगितलं...

Vaishali Patil

Karanvir Bohra Reaches Out To Deepika Padukone: गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड सिनेमांची बॉक्स ऑफिसवर चांगलीच हवा आहे. मग त्यात गदर 2 आणि OMG2, ड्रिम गर्ल 2 या सिनेमांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आता आगामी सिनेमांकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

त्यात शाहरुख खानचा जवान आणि सलमान खानचा टायगर 3 या सिनेमांची प्रेक्षकांनी उत्सूकता आहे. आता त्यातच आणखी एका हिट सिनेमांच्या घोषणेमुळे पुन्हा चर्चा रंगली आहे. तो सिनेमा म्हणजे फरहान अख्तरचा डॉन 3.

मात्र यावेळी डॉन 3 मध्ये शाहरुख खान नाही तर रणबीर सिंग काम करणार आहे. त्यामुळे काहींची नाराजी देखील झाली आहे.

रणवीरसोबत आता कोणती अभिनेत्री काम करणार हे नाव अद्याप समोर आलेले नाही. तरी देखील या सिनेमासाठी कियारा अडवाणी किंवा क्रिती सेनन या दोन्हीच्या नावाची चर्चा आहे. एकीकडे डॉन 3 च्या कलाकारांच्या नावाबद्दल चर्चा सुरु असतांनाच एका टिव्ही कलाकारांने डॉन 3 मध्ये काम मिळावं म्हणुन थेट बॉलिवूड अभिनेत्री आणि रणवीर सिंहची पत्नी दीपीका पादूकोणलाच मॅसेज केलाय.

या प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याची रणवीर सिंगच्या विरुद्ध खलनायक बनण्याची इच्छा होती. त्यामुळे त्याने थेटदीपिका पदुकोणकडे मदत मागितली. तो अभिनेता म्हणजे करणवीर बोहरा. करण एक प्रसिद्ध टिव्ही अभिनेता आहे.

करणवीर बोहरा सध्या सोनी टीव्हीच्या शो 'हम रहे ना रहे हम' मध्ये खलनायकाची भूमिका साकारत आहे.

याआधीही त्याच्या खलनायकाच्या भुमिका खुप गाजल्या आहेत. त्यामुळे डॉन 3 मध्येही खलनायकाच्या भुमिका मिळावी यासाठी त्याने दिपीकाला मॅसेज केला होता. करणने स्वत: एका मुलाखतीत याबाबत खुलासा केला.

याबद्दल बोलतांना करण म्हणाला की, रणवीर सिंगच्या 'डॉन 3' मध्ये त्याला त्याच्या चित्रपटात खलनायकाची भूमिका करायची होती. मात्र तो फरहान अख्तर किंवा त्याच्या निर्मिती टिमला ओळखत नव्हता. त्यामुळे त्याने जास्त विचार न करता थेट दीपिका पदुकोणला मेसेज केला.

त्याला वाटलं की चला एकदा नशीबावर विश्वास ठेवू कारण कधीही काहीही होऊ शकतं. दीपिका आणि तो एकमेकांना ओळखत होते. त्यामुळेच ृकरणने चित्रपटात काम करण्याची इच्छा व्यक्त केली.

विशेष म्हणजे हा मॅसेज केल्यानंतर त्याला दीपीकाचा रिप्लाय देखील आला. तिने करणला मॅसेज केला की, ती आत करणला काही मदत करु शकत नाही मात्र त्या बॅनरखाली जे या चित्रपटासाठी कास्टिंग करत आहे त्यांचा नंबर तिने शेयर केला.

मात्र करणकडे तो नंबर आधीच होता त्यामुळे त्याने लगेच त्या नंबरवर मॅसेज केला आणि चित्रपटात काही भुमिका असल्याचं कळवण्याची विनंती केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT