Kareena Kapoor Birthday News Kareena Kapoor Birthday News
मनोरंजन

Kareena Kapoor Birthday : बेबोचे पहिले नाव ठाऊक आहे का? कसं सुचलं करीना हे नाव

कपूर कुटुंबात जन्माला आलेली बेबो सर्वांचीच लाडकी आहे

सकाळ डिजिटल टीम

Kareena Kapoor Birthday News बॉलिवूडची बेबो म्हणजे करीना कपूर खानचा (Kareena Kapoor) आज वाढदिवस आहे. करीना ४२ वर्षांची झाली आहे. अवघ्या १९व्या वर्षी करीनाने ‘रेफ्यूजी’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले होते. कधी अभिनयामुळे तर कधी शाहीद कपूरसोबतच अफेअर मग ब्रेकअप, कधी झिरो फिगर तर कधी वयाने मोठ्या असलेल्या सैफसोबत अफेअरच्या चर्चांमुळे करीना कायमच चर्चेत राहिली आहे.

लोकांची पर्वा न करता करीनाने सैफसोबत संसार थाटला. दोन मुलांची आई झाली. मात्र, या सगळ्यात बॉलिवूडमधले तिचे अस्तित्व कायम राखले. करीना कपूर (Kareena Kapoor) हे नाव डोळ्यासमोर येताच तिच्या वलयातील या सर्व गोष्टी नजरेसमोर येतात. परंतु, तुम्हाला माहीत आहे का बॉलिवूडमध्ये चर्चेत असलेल्या करीनाच्या नावामागची खरी कहाणी.

कपूर कुटुंबात जन्माला आलेली बेबो सर्वांचीच लाडकी आहे. जेव्हा करीनाचा जन्म झाला तेव्हा तिचे आजोबा राज कपूर यांनी तिचे नाव सिद्धिमा ठेवले होते. मात्र, करीनाच्या आईने म्हणजेच बबीता यांनी हे नाव बदलून करीना असे ठेवले. खरं तर बबीता यांनी गरोदर असताना रशियन लेखिका लियो टॉल्स्टॉय यांची ‘एना कैरेनिना’ ही कादंबरी वाचली होती.

लाडाने बेबो म्हणतात

या कादंबरीमुळे प्रेरित होऊन त्यांना मुलीचे नाव सिद्धीमावरून करीना असे ठेवले. करीना या नावाचा अर्थ शुद्ध, निष्पाप असा आहे. असे असले तरी तिला कुटुंबात सगळेच लाडाने बेबो म्हणू लागले. करीनाने बॉलिवूडमध्ये एंट्री केल्यानंतरही बेबो म्हणून ओळखू लागले. लोकांची तमा न बाळगता करीनाने सैफशी लग्नगाठ बांधली. त्यानंतर करीनाने तिचे नाव करीना कपूर खान असे लावण्यास सुरुवात केली. तर करीना आणि सैफच्या जोडीला चाहत्यांनी सैफिना असे नावे दिले.

ट्रोल करणाऱ्यांची पर्वा केली नाही

करीना कायमच बिनधास्त व्यक्तिमत्त्वासाठी ओळखली जाते. वेगवेगळ्या मुद्द्यांवरून करीनाला अनेकदा ट्रोल करण्यात आले. मात्र, तिने कधीच ट्रोलर्सची पर्वा केली नाही. करीना आणि सैफला त्यांच्या मुलांच्या नावावरूनही नेटकऱ्यांनी ट्रोल केले होते. तैमूर आणि जहागीर या त्यांच्या मुलांच्या नावावरून नेटकऱ्यांनी करीना सैफला ट्रोल केले होते. मात्र, दोघांनी ट्रोल करणाऱ्यांची पर्वा केली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: दिलासादायक बातमी! ओसी मिळवण्याची प्रक्रिया सोपी आणि जलद होणार; नवे निकष लागू करणार, पण कोणते?

Pune Traffic Update: पुण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मंगळवारी वाहतुकीत बदल; मार्गांवरील वाहतुकीत तात्पुरते कसे आहेत बदल?

MI vs RCB: पांड्या ब्रदर्समध्ये वाद? कृणालने आधी हार्दिकला बाऊन्सर मारला अन् आऊट होताच असं काही केलं की...

विजय वर्मासोबत मटका किंगमध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री; व्यक्तिरेखेबद्दल म्हणाली..

Hydrogen Cooking Stove India : गॅस किंवा रॉकेलची गरज नाही, चक्क पाण्यावर चालतो 'हा' स्टोव्ह, मात्र किंमत ऐकून बसेल धक्का!

SCROLL FOR NEXT