Kareena Kapoor discloses the true reason behind her marriage esakal
मनोरंजन

Kareena Kapoor: सैफ सोबत लग्न करण्याचं खरं कारण काय होतं? करिनानं केला मोठा खुलासा!

कॉफी विथ करणमध्ये ती बोलली होती. करिनानं प्रख्यात अभिनेता सैफ अली खान सोबत लग्न केले असून तिला दोन मुलंही आहेत.

युगंधर ताजणे

Kareena Kapoor discloses the true reason behind her marriage: बॉलीवूडची बेबो म्हणून ज्या अभिनेत्रीचे नाव घेतले जाते ती म्हणजे करिना. गेल्या दोन दशकांहून अधिक काळ करिनानं तिच्या नावाची वेगळी ओळख तयार केली आहे. करिनानं अल्पावधीतच मोठ्या संख्येनं स्वताचा फॅनबेस तयार केला आहे. सोशस मीडियावर ती नेहमीच अॅक्टिव्ह राहिली आहे. इंस्टावर देखील तिचा चाहतावर्ग मोठा आहे.

आता करिनानं निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरच्या एका मुलाखतीमध्ये केलेला खुलासा समोर आला आहे. त्यामुळे ती चर्चेत आली आहे. करिना सध्या प्रोजेक्टऐवजी वैयक्तिक आयुष्यावर जास्त प्रमाणात बोलताना दिसत आहे. कॉफी विथ करणमध्ये ती बोलली होती. करिनानं प्रख्यात अभिनेता सैफ अली खान सोबत लग्न केले असून तिला दोन मुलंही आहेत. करिनानं याप्रसंगी अभिनेत्री अमिषाबाबतही धक्कादायक विधान केलं होतं.

इतक्या लहान मुलांना फटाके वाजवायचे नसतात हे कसं समजवायचं?

करणनं जेव्हा अमिषावरुन करिनाला प्रश्न विचारला होता त्यावरुन तिनं दिलेलं उत्तर चर्चेत आलं होतं. त्यानंतर तिला सैफसोबतच्या लग्नावरुन विचारलेल्या प्रश्नानं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. यावेळी करिनानं सैफसोबतचं डेटिंग आणि लग्न यावर मोकळेपणानं मत व्यक्त केलं आहे. करिना जे काही बोलली आहे ते सोशल मीडियावर चर्चेत आलं आहे.

मीडियासोबत बोलताना करिना कपूर म्हटली की, लग्नाचा हेतू काय असतो तर तुम्ही तुमचा वारसा पुढे सुरु ठेवावा. परिवाराची वाढ व्हावी. पाच वर्ष आम्ही एकमेकांना डेट केले होते. त्यानंतर आम्ही लग्नाचा निर्णय घेतला. आम्ही एकमेकांना समजावून घेतले. अनेक गोष्टींवर चर्चा केली होती. आम्हाला दोन मुलं हवी होती. आम्ही दोघांनी मिळुन तो निर्णय घेतला होता. अभिनेत्रीने मुलांच्या पालन पोषण यावर देखील मोकळेपणानं तिचं म्हणणं मांडलं आहे.

मुलं आणि त्यांचे पालन पोषण ही जबाबदारी दोघांची आहे. आम्ही ती निभावत आहोत. त्याचेही योग्य प्रकारे नियोजन केले तर काहीही अडत नाही किंवा त्रास होत नाही असेही करिनानं सांगितले.

मला माझ्या मुलांसमोर आयुष्य जगायचं आहे. त्यांना खूप साऱ्या गोष्टी सांगायच्या आहेत. समजावून सांगायचं आहे. हा आनंद देखील घ्यायचा आहे. मी जर त्यांना नेहमीच आनंदी ठेवू शकले तर ते देखील त्यांची प्रगती मोठ्या प्रभावीपणे करतील. असेही करिनानं त्या मुलाखतीमध्ये सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : मुंबईतील १४ फुटांवरील झोपड्यांवरील कारवाईला राष्ट्रवादीचा विरोध

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT