Kareena Kapoor disclose about her relationship with Shahis Kapoor 
मनोरंजन

करिनाने सोडलं शाहीदसोबतच्या रिलेशनशिपबद्दल मौन

वृत्तसंस्था

बॉलिवूडची बेबो करिना कपूर खान तिच्या शाहीद सोबतच्या ब्रेकअपवर फायनली बोलली... इतकंच नाही तर या ब्रेकअपनंतर तिचं सैफ सोबत कसं जुळलं हेही तिने दिलखुलासपणे सांगितलं...

जेव्हा करिनाला जब वुई मेट सिनेमासाठी शाहीदने साईन करण्यास सांगितलं तेव्हा ती शाहीदला डेट करत होती... मात्र, सिनेमाच्या रिलीजनंतर दोघांचेही मार्ग वेगळे झाले असं करिनाने एका मुलाखतीत सांगितलं.. करिना सांगते की, तिचं आयुष्य हे जब वुई मेट मधल्या गीत सारखं असल्याचं तिला वाटतं.. सिनेमाच्या उत्तरार्धात जसं गीतचं पात्र एक वेगळं वळण घेतं तसंच काहीसं करिनाच्या स्वतःच्या आयुष्यातही झाल्याचं ती सांगते.. 2007 मध्ये अभिनेता शाहीद कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर आजपर्यंत यावर मौन बाळगलेली करिना म्हणते की नियतीने आधीच सगळं ठरवून ठेवलेलं असतं...आणि याचा प्रत्यय तिला तेव्हा आला जेव्हा ती तिच्या आगामी टशन सिनेमासाठी काम करत होती.. याच सिनेमादरम्यान करिना आणि सैफमध्ये जवळीक वाढली..

जेव्हा इम्तियाज अली यांच्या जब वुई मेटच्या सेटवर करिना असायाची तेव्हाही ती तिच्या आगामी टशन सिनेमाबाबत जास्त उत्सुक असायची.. या सिनेमाासाठी ती करत असलेल्या तिच्या झिरो फिगरमुळे ती आधीच हेडलाईन्समध्ये होती त्यामुळे तिला कधी या सिनेमाच्या शूटींगला सुरुवात करतेय असं झालं होतं...

एकंदरीत करिनाने टशन सिनेमाची निवड केली होती ते तिचं करिअर बदलेल या दृष्टीने पण त्यानंतर तिला हे जाणवलं की जब वुई मेट या एका सिनेमाने तिचं करिअर बदललेलं तर टशन सिनेमामुळे तिचं आयुष्यंच बदलून गेलं जिथे तिला तिच्या स्वप्नातला राजकुमार मिळाला. 2012 मध्ये करिनाने सैफ अली खानसोबत लग्न केलं आणि 2016 मध्ये तैमुरचा जन्म झाला..तर दुसरीकडे शाहीदनेही मीरा राजपुत सोबत लग्न केलं...त्याला मुलगी मिशा आणि मुलगा झैन अशी दोन मुलं आहेत... बेबो करिना लवकरंच आगामी अंग्रेजी मिडियम आणि तख्त या सिनेमांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणारे..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate: २०२६ मध्ये सोन्याचा दर २ लाखांपर्यंत पोहोचणार? ज्योतिषांचं भविष्याबद्दल भाकित, दर वाढीचे स्पष्ट संकेत

Savalyachi Janu Savali मध्ये मोठा ट्विस्ट; असं समोर येणार सावलीच्या आवाजाचं सत्य; नेटकरी खुश, म्हणतात-

Elon Musk’s big hint for Content Creators : इलॉन मस्क करणार ‘कंटेट क्रिएटर्स’ना मालामाल!, ‘Youtube’ पेक्षा जास्त पैसा 'X' देणार

Dombivli Politics: ज्यांच्याशी वाद, त्यांच्याच सोबत रणनीती! डोंबिवलीत पॅनल २२ मधील ‘राजकीय गणित’ उघड

Vijay Hazare Trophy मध्येही दिसली 'पांड्या पॉवर'; चौकार - षटकारांची बरसात करत झळकावली शतकं, संघाचाही मोठा विजय

SCROLL FOR NEXT