kareena kapoor, cristiano ronaldo file image
मनोरंजन

रोनाल्डोच्या कोका-कोला प्रकरणावर करीनाची भन्नाट प्रतिक्रिया

प्रेस कॉन्फरन्सवेळी रोनाल्डोने समोर ठेवलेल्या कोका कोला ब्रँडच्या बाटल्या बाजूला सरकावल्या.

प्रियांका कुलकर्णी

प्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) युरो स्पर्धेतील पहिल्या मॅचपूर्वी पत्रकार परिषदेमध्ये एका घटनेमुळे चर्चेत आला. पोर्तुगाल आणि हंगेरी यांच्यातील सामन्यापूर्वी घेतलेल्या प्रेस कॉन्फरन्सवेळी रोनाल्डोने समोर ठेवलेल्या कोका कोला ब्रँडच्या दोन बाटल्या बाजूला सरकावल्या. त्यानंतर त्याने पाण्याची बाटल दाखवली. रोनाल्डोच्या कृत्याचा कोका कोला या कंपनीला मोठा फटका बसला. आता या सर्व घटनेवर सोशल मीडियावर मीम्स व्हायरल होत आहेत. यात अभिनेत्री करीना कपूर खाननेही Kareena Kapoor Khan एक मीम शेअर केला आहे. तिच्या 'जब वी मेट' या चित्रपटातील भूमिकेवर हा मीम तयार करण्यात आला आहे. (kareena kapoor funny reaction about ronaldo decision of coca cola)

2007मध्ये प्रदर्शित झालेल्या करीनाच्या 'जब वी मेट' या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. या चित्रपटामध्ये करीनाने 'गीत' नावाच्या मुलीची भूमिका साकारली होती. चित्रपटामध्ये करीनाचा एक डायलॉग आहे. त्यामध्ये ती म्हणते, 'कोक-सोडा हे सर्व त्यांच्या जागी.. पण पाण्याचं काम फक्त पाणीच करू शकतं.' करीनाचा हा डायलॉग खूप प्रसिद्ध आहे. याच डायलॉगचा मीम शेअर करत तिने रोनाल्डोच्या घटनेवर अप्रतिक्षरित्या प्रतिक्रिया दिली. करीनाच्या या विनोदी पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे.

रोनाल्डोच्या या कृतीमुळे कोका-कोलाचे मार्केट मूल्य ४ अब्ज डॉलर्सने कमी झाल्याचं दी गार्डियनने म्हटले आहे. कोका- कोलाचा शेअर ५६.१० डॉलरवरून ५५.२२ डॉलरपर्यंत खाली गेला होता. रोनाल्डोची सोशल मीडियावरील ताकद लक्षात घेतल्यास कोका-कोलास अजून फटका बसू शकेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT