actress kareena kapoor  
मनोरंजन

अभिनेत्री करीनाचा गृहप्रवेश, 'स्पेस' मिळावी म्हणून नवं घर

अभिनेत्री करीना कपूर kareena kapoor आणि सैफ अली खान saif ali khan हे नेहमी चर्चेत असणारं जोडपं आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - अभिनेत्री करीना कपूर kareena kapoor आणि सैफ अली खान saif ali khan हे नेहमी चर्चेत असणारं जोडपं आहे. त्यांच्या राहण्याची, खाण्याची, फिरण्याची एवढेच नाही तर त्यांच्या मुलांच्या नावाचीही चर्चा होत असते. बॉलीवूडमध्ये फार कमी सेलिब्रेटींच्या वाट्याला एवढी प्रसिद्धी येत असते. सैफिना हे त्यापैकी एक आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी ते त्यांच्या दुसऱ्या मुलाच्या नावावरुन चर्चेत आले. आता त्याला सगळे जेह म्हणून हाक मारतात. त्याचे नाव जहांगीर ठेवणार असल्याची चर्चा आहे. त्यावरुन सोशल मीडियावर वादाला सुरुवात झाली होती. अभिनेत्री स्वरा भास्करनंही यावेळी करिनाच्या समर्थनार्थ एक पोस्ट शेयर केली होती.

करिनाचं गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेग्नंसी बायबल नावाचं पुस्तकही प्रसिद्ध झालं होतं. त्या पुस्तकाच्या नावावरुन वादळं उठलं होतं. आता करिना चर्चेत आली आहे त्याचे कारण तिचा गृहप्रवेश. तिच्या गृहप्रवेशाचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. त्या फोटोंना चाहत्यांनी पसंती दर्शवली आहे. काहींनी तिला नेहमीप्रमाणं ट्रोलही केलं आहे. त्या फोटोमध्ये करिना आठ महिन्यांची गरोदर असताना ती किचनमध्ये काम करतानाचे फोटो व्हायरल झाले होते. त्याला चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट दिल्या आहेत. अनेकांनी असा तर्क लावला आहे की, तिच्या प्रेग्नंसी बायबल मधून तिचा तो किचनमधला फोटो घेतला होता.

त्याबरोबरच करिनाच्या दुसऱ्या मुलाचाही फोटो व्हायरल झाला आहे. जे फोटो व्हायरल झाले आहेत त्यात करिना किचनमध्ये उभी असल्याचे दिसून आले आहे. तिनं नारळ आणि फुल किचनला वाहिलं आहे. जहांगीरच्या जन्मापूर्वी ती तिच्या नव्या घरामध्ये शिफ्ट झाली होती. त्यामुळे आता नव्या घरात तैमुरचा भाऊ आणि करिना असे दोघे आहेत. तिच्या पहिल्या घरापेक्षा हे घर अधिक मोठे आहे. त्याठिकाणी करीनाला अधिक स्पेस मिळतो असंही तिनं म्हटलं आहे.

करीनाचं प्रेग्नंसी बायबल जास्त चर्चेत आहे. त्यात तिच्या छोट्या मुलाचे फोटोही आहेत. त्यात पुस्तकामध्ये तिनं आपल्या दुसऱ्या मुलाच्या नावाचाही उल्लेख केल्याची चर्चा आहे. त्यातूनच सोशल मीडियावर त्यावरुन चर्चेला सुरुवात झाली. आणि ती अजुनही होताना दिसते आहे. मात्र त्याचे नाव जहांगीर ठेवण्यावरुन अद्याप सैफिनाकडून कुठलेही अधिकृतपणे माहिती समोर आलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT