saif kareena 
मनोरंजन

सैफ-करिनाकडे पुन्हा 'गुड न्युज', अधिकृतरित्या केलं जाहीर

दिपालीराणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- करिना कपूर आणि सैफ अली खान त्यांच्या सिनेमांसोबतंच आणखी एका गोष्टीमुळे चर्चेत असतात ते म्हणजे त्यांचा मुलगा  तैमुर. जेव्हा पासून तैमुरचा जन्म झाला आहे तेव्हापासून त्याच्या फोटोंचा इंटरनेटवर धुमाकुळ दिसून  आला आहे. करिना-सैफ आणि तैमुरच्या चाहत्यांसाठी अत्यंत गोड बातमी आहे. करिना आता दुस-यांदा आई होणार आहे. करिनाचे चाहते देखील करिनाच्या या गुड न्युजची कधीपासून वाट पाहत होते. तैमुर नंतर अनेकदा ती प्रेग्नंट असल्याच्या अफवा पसरत होत्या मात्र आता या अफवांना पूर्णविराम मिळाला आहे. 

करिना कपूर खान आणि सैफ आली खान यांनी ही गोष्ट अधिकृतरित्या सगळ्यांना सांगितली आहे. दोघांनी एक स्टेटमेंट जाहीर केलं आहे. या स्टेटमेंटमध्ये त्यांनी म्हटलंय, 'आम्हाला हे सांगताना अत्यंत आनंद होत आहे की आमच्या कुटुंबात आता नवीन पाहुण्याचं आगमन होणार आहे. आमच्या सगळ्या शुभचिंतकांनी दिलेल्या प्रेम आणि सहकार्यासाठी त्यांचे आभार.'

करिनाने याआधी एका चॅट शोमध्ये सांगितलं होतं की तिला आणि सैफला त्यांचं कुटुंब वाढवायचं आहे. तिने हे देखील सांगितलं होतं की कदाचित दोन वर्षांनतर ते दुस-या मुलाबाबत विचार करतील. जेव्हा करिना पहिल्यावेळी प्रेग्नंट होती तेव्हा सोशल मिडियावर तिची खूप चर्चा होती. तिच्या बेबी बंपसोबतचे तिचे अनेक फोटो व्हायरल झाले होते. सध्या लॉकडाऊनमुळे करिना सैफ आणि मुलगा तैमुरसोबतंच घरातंच वेळ घालवत आहे. तिचे अपडेट्स ती तिच्या चाहत्यांसाठी नेहमी सोशल मिडियावर शेअर करत असते.   

kareena kapoor khan and saif ali khan expecting their second child  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026 : आजोबा भाजी विकायचे, वडील शिवणकाम करतात... लव्हप्रीतने भारतासाठी जिंकले ऐतिहासिक पदक!

Commonwealth Games 2026 : घोर निराशा... तजिंदरपाल सिंग तूर पदक जिंकण्यापासून वंचित, समरदीप सिंगलाही अपयश; नेमकं कुठे चुकले?

Anti paper leak bill: विरोधकांचा सभात्याग अन् 'पेपरफुटी'विरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर; अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवले जाणार

Phule Wada Memorial Delay: फुले वाडा व सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम संथ; छगन भुजबळ यांची पुणे महापालिकेवर कडक टीका

Pune Police Misconduct: तपासाऐवजी पर्यटन; विश्रामबागेतील तीन पोलिसांवर कारवाई, दोन वर्षे वेतनवाढ रोखली

SCROLL FOR NEXT