मनोरंजन

सैफीनाला बाहुबलीची 'बिर्याणीची ट्रीट': फोटो व्हायरल

सैफीना (saifina) हे बॉलीवूडमधील (bollywood) सर्वात चर्चेत असणारं कपल आहे.

युगंधर ताजणे

सैफीना (saifina) हे बॉलीवूडमधील (bollywood) सर्वात चर्चेत असणारं कपल आहे. ते सोशल मीडियावर देखील नेहमीच चर्चेत असतात. कधी त्यांच्या मुलाच्या नावावरुन तर त्यांच्या हटक्या फोटोशुटवरुन. आता ते चाहत्यांच्या चर्चेत आले आहे त्याचे कारण म्हणजे त्यांना बाहुबलीनं (bahubali) बिर्याणीची ट्रीट दिली आहे. त्याचे फोटो सोशल मीड़ियावर व्हायरल झाले आहेत. त्याला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. बिर्याणीची दावत दोघांनीही इंजॉय केली आहे. गेल्या काही दिवसांपासून करिना तिच्या एका वक्तव्यावरुन चर्चेत आली होती. तिनं रामायणावरील एका चित्रपटात सीतेची भूमिका करण्यावरुन एक प्रतिक्रिया दिली होती. त्यासाठी झालेल्या मानधनाच्या प्रकरणावरुन तिच्यावर नेटकऱ्यांनी सडकून टीका केली होती. अखेर ती भूमिका बॉलीवूडची क्वीन करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

येत्या काळात करिनाचा आमिर खानसोबत लाल सिंग चढ्ढा नावाचा चित्रपट येणार आहे. खरं तर हा चित्रपट ख्रिसमसमध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र आता तो व्हँलेटाईनच्या औचित्यानं प्रदर्शित केला जाणार असल्याचे सांगण्यात आहे. गेल्या दोन वर्षांपासून आमिरच्या लाल सिंग चढ्ढा चित्रपटाची चर्चा आहे. त्यात करिनानं प्रमुख भूमिका साकारली आहे. आमिरचा त्यातील लूकही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हॉलीवूडमधील गाजलेला फॉरेस्ट गंप नावाच्या चित्रपटाचा हा हिंदी रिमेक आहे. त्याच्याबद्दल चाहत्यांना कमालीची उत्सुकता आहे. करिनानं मध्यंतरी प्रेग्नंसी बायबल नावाचे पुस्तकही लिहिले होते. त्यावरुन ती वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. तिच्या दुसऱ्या मुलाचे नाव जहांगीर ठेवण्यात आल्याच्या चर्चेनं तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले होते.

आता करिना आणि सैफ अली खानचे बिर्याणी पार्टीचे फोटो व्हायरल झाले आहे. करिनानं आपल्या इंस्टावरुन ते फोटो व्हायरल केले आहेत. टॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेता प्रभासनं त्यांना ही ट्रीट दिली होती. बाहुबलीनं सैफीनाला बिर्याणीची ट्रीट देणं या दोन्ही सेलिब्रेटींच्या चाहत्यांना आवडलं आहे. चाहत्यांना त्यांचे फोटो कमालीचे आवडले आहेत. त्यांनी या फोटोला लाईक्स करुन वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंटही दिल्या आहेत. तिनं हे फोटो प्रभासला टॅग करुन त्यावर आदिपुरुषचा हॅशटॅगही दिला आहे. येत्या वर्षी आदिपुरुष नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यात सैफ अली खाननं रावणाची भूमिका केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG, 2nd T20I: रवी बिश्नोईची 'ती' चूक महागात पडली! जेकब बेथलच्या आक्रमणामुळे भारताविरुद्ध इंग्लंडचा ऐतिहासिक विजय

IND vs ENG, 2nd T20I: अक्षर पटेलने इंग्लंडच्या कॅप्टनला आऊट करत घडवला इतिहास; यापूर्वी कोणत्याही भारतीय फिरकीपटूला जमलं नव्हतं!

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

SCROLL FOR NEXT