Kareena Kapoor Khan Instagram
मनोरंजन

Kareena Kapoor: जेव्हा करीनाला दिली गेली होती Sex Goddess ची उपमा..अभिनेत्रीनं भर मुलाखतीत तडक म्हटलं होतं..

करीना कपूरला एका मॅगझीननं 'सेक्स गॉडेस' म्हटलं होतं तेव्हा अभिनेत्रीनं एका मुलाखतीत त्यावर रिअॅक्शन दिली होती,ज्याची पुढे जोरदार चर्चा रंगली होती.

प्रणाली मोरे

Kareena Kapoor: बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूर खाननं २००० साली 'रेफ्यूजी' सिनेमातून आपल्या करिअरला सुरुवात केली. करिनानं आपल्या करिअरमध्ये भले काही फ्लॉप सिनेमे दिले असले तरी काही हिट सिनेमांचा देखील ती भाग राहिली आहे.

करिनाच्या स्टायलिश अदांचे अनेकजण दिवाने आहेत. करीनाला एकदा एका मॅगझीननं 'सेक्स गॉडेस' म्हटलं होतं..ज्यावर करीना कपूरनं तडक रीअॅक्शन दिली होती.

चला जाणून घेऊया अभिनेत्री नेमकं काय म्हणाली होती.(Kareena Kapoor Khan felt very flattered when a magazine called her sex goddess)

२००२ साली करीना कपूर खाननं फिल्मफेअर सोबतच्या मुलाखती दरम्यान म्हटलं होतं की,''मला आता वाटतंय की मी इथे कायम टॉपला राहण्यासाठी आली आहे आणि कायम तिथे राहण्यासाठी सेक्सी,ग्लॅमरस आणि आकर्षक दिसावंच लागतं''.

'' ज्या अभिनेत्री टॉपवर राहिल्या आहेत..रेखा,श्रीदेवी,माधुरी,करिश्मा सगळ्याच ग्लॅमरस होत्या. रेखा यांना तर 'सेक्स गॉडेस' म्हटलं जातं. मी देखील तेव्हा खूप खूश झाले होते जेव्हा एका मॅगझीनने मला 'सेक्स गॉडेस' म्हटलं होतं''.

करीना पुढे म्हणाली होती,''फक्त पंजाबी ड्रेस घालून मी स्तःला सिद्ध नाही करू शकत. मी एक चांगली अभिनेत्री आहे. भूमिका जशी असेल तसेच कपडे घालावे लागतात. जसं 'कभी खूशी,कभी गम' सिनेमात 'पू' या माझ्या व्यक्तीरेखेचे कपडे खूपच बोल्ड होते. मला नंबर वन अभिनेत्री बनायचं आहे तर मग मी माझ्या कपडे घालण्यावर बंधनं का घालून घेऊ''.

मुलाखती दरम्यान करिना माधुरी आणि श्रीदेवी यांच्याविषयी बोलताना म्हणाली होती,''माझे कोणतेही दोन सिनेमे एकसारखे नसतात. सध्या कोणत्याही अभिनेत्रीपेक्षा मला मानधन जास्त मिळालं तर ते मला प्रशंसनीय वाटतं''.

''यावरनं हे कळतं की फिल्म मेकर्सच नाही तर प्रेक्षकांचा देखील माझ्यावर विश्वास आहे. फक्त हिट सिनेमांचा भाग असलात की तुम्ही हीट होत नाही. माधुरी आणि श्रीदेवी यांना देखील लगेच यश मिळालं नव्हतं. माधुरी दिक्षितचे तर सुरवातीचे सिनेमे कितीतरी फ्लॉप राहिले होते''.

श्रीदेवी यांनी 'नगिना','चांदनी' आणि 'मिस्टर इंडिया'..सारखे हिट सिनेमे दिले..पण इंडस्ट्रीत काही वर्ष घालवल्यानंतर त्यांना हे यश मिळालं. रेखा यांनी आपल्या करिअरमध्ये किती ब्लॉकबस्टर्स दिले? आणि त्या मूव्ही गॉडेस आहेत.

करिना कपूरच्या करिअरविषयी बोलायचं झालं तर लवकरच ती हंसल मेहताच्या सिनेमात दिसणार आहेत. याव्यतिरिक्त ती सुजॉय घोष च्या 'द डिव्होशन ऑफ सस्पेक्ट एक्स' मधनं डिजिटल विश्वात पदार्पण करणार आहे. यात तिच्यासोबत विजय वर्मा आणि जयदीप अहलावत देखील नजरेस पडणार आहेत. तसंच करिना तब्बू आणि कृति सननसोबत 'क्रू' सिनेमात देखील नजरेस पडणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT