Kareena Kapoor And Alia Bhatt Bought New Luxury Car  esakal
मनोरंजन

Alia Bhatt New Car : राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर आलियाचा पुन्हा नवा 'कार'नामा, नवरात्रीचा मुहूर्त साधला!

आलियानं कार घेण्यापूर्वी करिनानं नवी लक्झरी कार खरेदी केली होती. बेबोनं देखील आपल्या नवीन कारचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

युगंधर ताजणे

Kareena Kapoor And Alia Bhatt Bought New Luxury Car : बॉलीवूडची बेबो म्हणून लोकप्रिय झालेल्या करिना कपूर खाननं काही दिवसांपूर्वी नवीन कार खरेदी केली होती. त्यानंतर आता प्रसिद्ध अभिनेत्री आलियानं देखील नवरात्रीचे निमित्त साधून खरेदी केलेल्या कारची चर्चा आहे. त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.

आलियानं कार घेण्यापूर्वी करिनानं नवी लक्झरी कार खरेदी केली होती. बेबोनं देखील आपल्या नवीन कारचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्याला मिळालेला प्रतिसाद मोठा होता. चाहत्यांनी करिनाचे कौतुक केले होते. गेल्या काही दिवसांपासून करिना चर्चेत आली आहे. तिचा बर्मिंगहॅम नावाचा चित्रपट प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. करिनानं लँड रोव्हर डिफेंडर ११० एसयुव्ही खरेदी केली असून १.२ कोटी रुपये आहे.

करिनाकडे रेंज रोव्हर शिवाय मर्सिडीज बेंज एस क्लास, रेंज रोव्हर वोग,बीएमडब्ल्यू ७ सीरिज आणि आणखी काही एसयुव्ही कार आहेत. ज्याची नेहमीच चर्चा होत असते. करिनासोबत तिचा पती अभिनेता सैफ अली खानला देखील नवनवीन कार खरेदी करण्याची आवड आहे.

काही दिवसांपूर्वी आलियाला राष्ट्रीय पुरस्कारानं गौरविण्यात आले होते. तिला गंगुंबाई काठियावाडी या चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. आलियाला हा पुरस्कार मिळाल्यानंतर तिच्यावर नेटकऱ्यांनी, चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. त्यांनी तिच्या आगामी प्रोजेक्टसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. यानंतर आलिया पुन्हा चर्चेत आली आहे ते तिच्या नव्या कारच्या खरेदीमुळे.

आलियानं जी नवी कार घेतली तिनं त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेयर केला आहे. त्या कारची किंमत ३.८१ कोटी इतकी आहे. असे सांगितले जात आहे. चाहत्यांनी त्या व्हिडिओवर दिलेल्या कमेंटस भन्नाट आहेत. आलियाच्या कार कलेक्शनविषयी बोलायचे झाल्यास रेंज रोव्हरची ऑटोबायोग्राफी लाँग व्हिल दाखल झाली आहे.

आलिया आणि करिनाच्या वर्कफ्रंटविषयी बोलायचे झाल्यास करिना ही आगामी काळात सिंघम ३ मध्ये दिसणार आहे. ही एक तिची मल्टिस्टारर फिल्म असणार आहे. ज्यात दीपिका पदुकोण, टायगर श्रॉफ, रणवीर सिंग, अक्षय कुमार आणि अजय देवगण दिसणार आहेत. त्याचे दिग्दर्शन रोहित शेट्टी करणार आहे.

आलियाची अपकमिंग फिल्म बैजू बावरा, तख्त आणि ब्रम्हास्त्र २ असणार आहे. यापूर्वी तिच्या ब्रम्हास्त्र नावाच्या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता. त्यानं बॉक्स ऑफिसवर चारशे कोटींपेक्षा जास्त कमाई केली होती. यापूर्वी तिचा रणवीर सिंग सोबत रॉकी और रानी की प्रेम कहानी प्रदर्शित झाला होता. त्यालाही प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI News: RBI सरकारला देणार तब्बल 2.87 लाख कोटी! कारण काय? बँकिंग,शेअर बाजार आणि अर्थव्यवस्थेवर काय परिणाम?

IPL 2026 Playoff Scenarios: सनरायझर्स हैदराबादविरुद्ध Eliminator सामना कोण खेळणार? एका जागेसाठी ४ संघात टक्कर; पाहा समीकरण

Pune Metro Leak : पुणे मेट्रोत गळती! कोट्यवधींच्या प्रकल्पाच्या सुरक्षेवर मोठा सवाल; VIDEO पाहून पुणेकर हादरले

Marathi Live News update: अमरावती जिल्ह्यात 24 वर्षीय युवकाचा 11 केव्ही लाईन चा शॉक लागून मृत्यू

Cockroach Janta Party चे इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक! तुमचं इन्स्टाग्राम हॅक होऊ नये यासाठी आजच बदला 'या' 3 सेटिंग

SCROLL FOR NEXT