saif ali khan and kareena kapoor  google
मनोरंजन

दर दहा वर्षांनी सैफ होतोय बाबा, करीना म्हणतेय, आता तरी थांबा..

नुतक्याच एका मुलाखतीत करीना कपूरने सैफ अली खानची खिल्ली उडवली आहे. वयाच्या प्रत्येक टप्प्यावर सैफला मुल झाले असून आता वयाच्या साठीत तरी त्याने थांबावे असे करीना गमतीने म्हणाली.

नीलेश अडसूळ

Etertainment news : करीना कपूर, (kareena kapoor) सैफ अली खान (saif ali khan) आणि त्यांचा मुलगा तैमूर (taimur ali khan) आणि जेह हे पूर्ण कुटुंबच कायम चर्चेत असते. सैफ आणि करीना माध्यमांसमोर एकमेकांविषयी भरभरून बोलतात. चित्रपटातील कामाविषयीही ते एकमेकांना प्रोत्साहन देतात. नुकत्याच झालेल्या मुलाखतीत करिनाने सैफचे आता वय झाले आहे याची त्याला मिश्किलपणे जाणीव करून दिली आहे.

करीना कपूर गमतीने म्हणाली की तिचा पती सैफ अली खान वयाच्या प्रत्येक दशकात बाप झाला आहे. सैफ जेव्हा विशीत होता तेव्हा त्याला आणि त्याची पहिली पत्नी अमृता सिंग यांना सारा अली खान ही पहिली कन्या झाली. जेव्हा तिशीत आला तेव्हा सैफ आणि अमृता यांना दुसरा मुलगा इब्राहिम अली झाला. सैफने चाळीशीत प्रवेश केला तेव्हा आमचे लग्न झाले आणि आम्हाला तैमूर अली खान हा मुलगा झाला. सैफने पन्नाशीत प्रवेश केला आणि आम्हाला जेह च्या रूपाने दुसरे बाळ झाले.

करीना कपूरने अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत सैफला दर दशकात मूल होत असल्याचे सांगितले. 'सैफला वयाच्या प्रत्येक दशकात एक मूल झाले आहे. त्याच्या विशी, तिशी, चाळीशीत आणि पन्नाशीतही. आता वयाच्या साठीत असे काहीही होऊ देणार नाही, असे मी त्याला स्पष्ट सांगितले आहे,असे करीना म्हणाली.

एवढेच नाही तर ती पुढे म्हणाली, 'सैफसारखा व्यापक विचार असलेला माणूसच वेगवेगळ्या टप्प्यांवर चार मुलांचा बाप होऊ शकतो. आता जेहच्या जन्मानंतर कुटुंबाकडे आम्ही जास्त लक्ष देऊन ते अधिक चांगल्या पद्धतीने सांभाळण्याचा प्रयत्न करत आहोत. किंबहुना आम्ही आपापसात काही गोष्टी ठरवून घेतल्या आहेत. जेव्हा तो एखाद्या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त असेल तेव्हा मी कोणतेही काम घेणार नाही. हेच त्याच्याही बाबतीत आहे मी जेव्हा एखाद्या चित्रीकरणात व्यस्त असेल तेव्हा तो कोणतेही काम घेणार नाही.'

याआधी सारा अली खानही एका मुलाखतीत म्हणाली होती की, एकदा मी आणि माझे वडील सैफ अली खान सहज गप्पा करत असताना आमच्यामध्ये विनोद घडला. जेह अली खानच्या जन्मानंतर सारा अली खान त्याला भेटायला गेली होती , त्या भेटीच्या आठवणी साराने सांगितल्या आहेत. ती म्हणाली, “जेह हा अतिशय सुंदर आहे. माझ्या वडिलांना त्यांच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर एक मूल झाले आहे. म्हणजे विशी, तिशी, चाळीशी आणि पन्नाशीतही. वयाच्या वेगवगेळ्या टप्प्यात पितृत्वाचा आनंद त्यांना घेता आल्याने ते भाग्यवान आहेत,'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानी लष्करावर हल्ला करण्याचा कट! कर्नाटकात तरुणाला अटक; कोण आहे असफुल मलिक?

घरात काम करणारीच्या मानेवर लव्ह बाइट; तिने बॉयफ्रेंडचं नाव सांगताच पूजा बेदी झालेली शॉक; निघाला अभिनेत्रीचा...

IND vs SL, 1st Test: टी ब्रेक संपला, केएल राहुल मैदानात आला, पण एकही बॉल न खेळला रिटायर्ड हर्ट झाला... नेमकं घडलं काय?

Marathi News Live Updates : भारताकडून वेल्सचा ३-१ असा पराभव

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे जेवायला रेस्टॉरंटमध्ये गेले, ताटात नकली पनीर आढळलं; पुढे काय झालं? आयुक्तांनी कारवाईचा किस्साच सांगितला!

SCROLL FOR NEXT