kareena Kapoor-Khan Google
मनोरंजन

''कोरोनामुळे सध्या मी हे भोगतेय";करिनाची ती पोस्ट होतेय व्हायरल

करण जोहरच्या पार्टीला जाऊन आल्यावर तिला कोवीडची लागण झाली होती...

प्रणाली मोरे

'कोरोना अजुनही पूर्णपणे गेला नाही,आपली काळजी घ्या,कोरोनाचे नियम पाळा,गर्दीत जाणं टाळा' असं सरकारतर्फे वारंवार सांगितले जात असतानाही लोकं त्या नियमांना कसे धाब्यावर बसवतायत याचं नुकतंच एक ताजं उदाहरण पहायला मिळालं. आता ज्यांना सो कॉल्ड 'सेलिब्रिटी','पब्लिक फीगर' म्हणून ओळखलं जातं,ज्यांना लोकं फॉलो करतात अशांनीच जर नियम धाब्यावर बसवले तर कसं होणार बरं. काही दिवसांपूर्वी बॉलीवूडकरांनी एकत्र येऊन पार्टी केली अनं एका मागोमाग एक पार्टीला आलेल्या अनेकजणांना कोरोनाची लागण झाली. आता यात सर्वात पहिलं नाव समोर आलं ते करिना कपूरचं(Kareena Kapoor-Khan). आणि तिच्या मागोमाग तिची खास मैत्रिण अमृता अरोराचं.

Kareena Kapoor-Khan,Saif Ali Khan

या पार्टीचा कर्ता-करविता होता निर्माता-दिग्दर्शक करण जोहर. त्याची कोरोना चाचणी मात्र निगेटीव्ह आली असली तरी त्याच्यामुळे करिना मात्र सध्या हालाखीत जीवन जगतेय असं तिनं केलेल्या एका पोस्टवरनं लक्षात येतय. करिनानं तिच्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर केलेत,जे तिनं तिच्या मोबाईलमधनं घेतले आहेत. आता ते फोटो आहेत तिनं तिच्या बालकणीतनं पलिकडच्या इमारतीतील घराच्या बालकणीत उभ्या असलेल्या सैफ अली खानचे खेचलेले. त्या फोटोत सैफ हातात चहाचा कप घेऊन तो पिताना दिसत आहे. आता करिना सध्या कोविडमुळे क्वारंटाईन आहे. आणि तिचं कुटुंब तिच्यापासून दूर. त्यामुळे ती त्यांना खूप मिस करीत आहे. पण या कोरोनाच्या काळातही सैफसोबत रोमान्स करण्याची एकही संधी ती सोडत नाहीय. त्याला आपल्या कॅमे-यात बंदिस्त करून तिनं त्याच्यासोबत दूरुन का होईना पण काही रोमॅंटिक क्षण शेअर केले ते असे. शूटिंगच्या निमित्तानं मुंबईबाहेर असलेला सैफ करीनाला कोरोनाची लागण झाल्यावर लगेच घरी निघून आला आहे.

Saif Ali Khan and chocolate pieces

करिनानं कोरोनाची लागण झाल्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट केली होती की, ''माझ्या संपर्कात आलेल्यांनी कोरोनाची तपासणी करून घ्यावी. मी माझ्या तब्येतीची काळजी घेत आहे. माझे कुटुंबिय आणि स्टाफही दोन डोस घेतल्यामुळे सुरक्षित आहेत''. सैफचा फोटो शेअर करतानाच तिनं तिची मैत्रिण रिया कपूरची आई सुनिता कपूरनं पाठवलेल्या चॉकलेटचे देखील फोटो शेअर केले आहेत. तिनं त्यासाठी सुनिता कपूर यांचे आभारही मानले आहेत. बॉलीवूडच्या कलाकारांनी पार्टी करून कोरोना पसरवल्याची बातमी उघडकीस आल्यानंतर मुंबई महानगरपालिकेनं २५ ते ३१ डिसेंबर दरम्यान मुंबईत पार्टी करण्यावर बंदी आणली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Education : विधान परिषदेत शिपायाच्या कंत्राटी पदावरून पेच; सत्ताधारी शिक्षक, पदवीधर आमदारांनीच केला सभात्याग

Ashadhi Ekadashi 2025: मुखात तुझे नाव, डोळ्यात तुझे गाव;डिगडोहमध्ये ‘विठ्ठल रखुमाईचा दर्शन सोहळा, माऊली ग्रुपचा उपक्रम

Ahilyanagar: 'श्रीरामपूरकरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्वागत'; ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोष

Pune Crime : सोसायट्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर, कोंढव्यातील घटनेनंतर भीती; सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा यंत्रणेवरही प्रश्‍नचिन्ह

Ashadhi Wari 2025:'वरुणराजाच्या साक्षीने संत भेटीचा सोहळा'; बोंडले येथे संत तुकाराम महाराज व संत सोपानदेव महाराज यांची भेट

SCROLL FOR NEXT