मनोरंजन

गरोदरपणातील शरीरसंबंधाच्या विषयावर करीना कपूरने मांडलं तिचं मत

"या विषयावर खूप कमी बोललं जातं. पण हा विषय कुठल्याही दाम्पत्यासाठी तितकाच महत्त्वाचा आहे."

स्वाती वेमूल

गरोदरपणातील काळ हा प्रत्येक स्त्रीसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. या काळात स्त्रीच्या शारीरिक आणि मानसिक बदलांची जाण ठेवून जोडीदाराने तिला साथ देणंही तितकंच गरजेचं असतं. गरोदरपणातील शरीरसंबंध या विषयावर खूप कमी बोललं जातं. पण हा विषय कुठल्याही दाम्पत्यासाठी तितकाच महत्त्वाचा आहे. अभिनेत्री करीना कपूरने तिच्या गरोदरपणातील अनुभवांवर 'प्रेग्नन्सी बायबल' हे पुस्तक लिहिलं. नुकतंच हे पुस्तक प्रकाशित झालं आणि यानिमित्ताने निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने तिची मुलाखत घेतली. या मुलाखतीत करीना विविध विषयांवर मोकळेपणे व्यक्त झाली. त्यातीलच एक विषय होता, गरोदरपणातील शरीरसंबंध.

"गरोदर असताना कामजीवनावर कशापद्धतीने परिणाम होतो, याबद्दल तू स्वत: व्यक्त झाली होतीस. त्यावेळी सैफ अली खानने तुला कशापद्धतीने समजून घेतलं, हेसुद्धा तू सांगितलं होतंस. गरोदरपणात स्त्रियांच्या नेमक्या काय भावना असतात आणि तुला स्वत:ला त्याविषयी काय वाटलं होतं", असा प्रश्न करणने करीनाला विचारला.

करणच्या प्रश्नावर करीनाचं उत्तर-

"कामजीवनात जोडीदाराला समजून घेणं, त्याला काय हवंय, नकोय लक्षात घेऊन वागणं खूप गरजेचं असतं. गरोदरपणात या गोष्टी अधिक महत्त्वाच्या वाटू लागतात. गरोदरपणात स्त्रिया ज्या पद्धतीने भावनांना, मूड स्विंग्सना सामोरं जातात, त्याची कल्पना दुसरा कोणता व्यक्ती करूच शकत नाही. कधी अचानक मला स्वत:विषयी खूप सकारात्मक वाटायचं, तर कधी अचानक मला स्वत:विषयी वाईट वाटू लागायचं. सहा महिन्यांनंतर हा काळ आणखी अवघड होऊ लागतो. कधीकधी, ती फक्त तिरस्काराची भावना असते. नेमका कसा विचार करावा हेच आपल्याला त्या मनस्थितीत समजत नाही. अशा वेळी तुम्हाला समजून घेणारा जोडीदार असणं खूप महत्त्वाचं असतं. गरोदरपणात स्त्रियांनी खूप सुंदर दिसावं यासाठी जोडीदाराने त्यांच्यावर दबाव टाकू नये असं मला वाटतं," असं मत करीनाने मांडलं.

"त्या ठराविक काळात स्त्रियांना काय वाटतं याकडे जोडीदाराने अधिक लक्ष दिलं पाहिजे. जर तुमच्या पतीला ही गोष्ट समजू शकत नसेल, तर तो तुमच्या मुलांचा पिता कसा होणार? तुमच्या प्रत्येक स्वरूपात त्याने तुमच्यावर प्रेम केलं पाहिजे. या विषयावर मी माझ्या पुस्तकात लिहिलं आहे. कारण बहुतेक स्त्रियांना याबद्दल बोलण्यास भीती वाटते," असंही ती यावेळी म्हणाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance Tips: हेल्थ इन्शुरन्स घेताना या गोष्टी तपासल्या नाहीत तर Claimच्या वेळी बसू शकतो मोठा धक्का!

IND vs WI: मॅचच्या काही तास आधी मोठं संकट! इकाना स्टेडियमजवळ गोमतीचं पाणी, अंडरपास जलमय; भारत-वेस्ट इंडिजच्या सामन्यावर प्रश्नचिन्ह?

‘मला पाहून महिला थुंकायला आणि चपलेने मारायला यायच्या’; दृश्यममधील गायतोंडे फेम कमलेश सावंत म्हणाले...‘ही खंत आयुष्यभर राहील’

Marathi News Live Updates: ऑक्टोबरच्या उकाड्यानंतर कर्जतला पहाटे दाट धुक्याची चादर; आल्हाददायक वातावरणाने नागरिक सुखावले

Kolhapur Gokul Election: ‘गोकुळ’च्या एका जागेवरून महायुतीत तिढा; राष्ट्रवादीला आणखी एक जागा, यड्रावकर गटाच्या जागेवरून घमासान

SCROLL FOR NEXT