Kareena Kapoor Tell Taimur Incident Nanny change  esakal
मनोरंजन

Kareena Kapoor : 'ममा आपली नॅनी नेहमीच...,' तैमूरचा तो प्रश्न अन् सैफच्या घरातील नियम बदलले!

आपल्याला जे योग्य वाटते त्यावर ठामपणे व्यक्त होणाऱ्या सेलिब्रेटींमध्ये करिनाचे नाव घ्यावे लागेल.

युगंधर ताजणे

Kareena Kapoor Tell Taimur Incident Nanny change : बॉलीवूडची बेबो म्हणून लोकप्रिय झालेल्या करिनानं प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खानशी लग्न केलं आणि तिच्याभोवती नेहमीच वेगळीच चर्चा होत राहिली. लग्नानंतरही तिच्याविषयी वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी समोर येताना दिसतात. करिनाला तैमूर आणि जेह ही दोन मुलं आहेत. सध्या करिनाची एक मुलाखत खूपच चर्चेत आली आहे.

आपल्याला जे योग्य वाटते त्यावर ठामपणे व्यक्त होणाऱ्या सेलिब्रेटींमध्ये करिनाचे नाव घ्यावे लागेल. सैफशी लग्न करण्याचा विचार, त्याला कुटूंबियांनी दिलेली साथ यावर करिनानं इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये बिनधास्तपणे भाष्य केले आहे. तसेच तैमूर आणि जेहच्या वेगवेगळ्या आठवणीही तिनं यावेळी शेयर केल्या आहेत. तैमूरच्या त्या प्रश्नानं आमच्या घरातील तो नियम कसा बदलला हेही तिनं सांगितलं आहे.

Also Read - सारखी चक्कर येते? मग नका करु दुर्लक्ष...'हे' असू शकतं कारण!

करिना कपूर ही बॉलीवूडमधील प्रसिद्ध सेलिब्रेटी आहे. तिचा चाहतावर्गही मोठा आहे. सध्या ती तिच्या जाने जान नावाच्या चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. तो नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. याशिवाय प्रसिद्ध दिग्दर्शक हंसल मेहता यांच्या द बकींगहॅम मर्डर्समध्ये देखील करिना दिसणार आहे. त्यामुळे करिनाच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.

करिनाच्या मुलांची देखभाल करणाऱ्या दाईचे नाव सविता असे आहे. ती तैमूर आणि जेहची काळजी घेत असते. करिनानं त्या मुलाखतीमध्ये सविताशी संबंधित एक किस्सा सांगितला. करिना म्हणाली, एकदा तैमूर त्याच्या डायनिंग टेबलवर जेवण करत होता. आणि सविता दुसऱ्या टेबलवर जेवण करत होती. तेव्हा तैमूरनं मला विचारलं की, ती नॅनी दुसऱ्या टेबलवर का जेवण करत आहे, त्यानंतर जेहनं देखील मला हाच प्रश्न विचारला होता. त्यांना मला काय सांगता आले नाही.

त्यानंतर मी आणि सैफनं असं ठरवलं की, जेव्हा तैमूर आणि जेह एकत्र जेवणार असतील तेव्हा त्यांच्या नॅनीला सोबत देखील जेवण करावे लागणार. सैफच्या घरातील तो नियम आम्हाला तैमूरमुळे बदलावा लागला होता. त्यांची नॅनी दोन्ही मुलांची खूपच चांगली काळजी घेते तेव्हा तिला देखील योग्य तो आदर आणि सन्मान मिळायला हवा. ही आमची त्यामागील भावना होती.

करिना आणि सैफच्या घरातील त्या नॅनीची नेहमीच खूप चर्चा होत असते. नॅनीला मिळणारी सॅलरी आणि तिचे शिक्षण यावरुन सोशल मीडियावर नेटकरी चर्चा करत असतात. त्याविषयीचे मीम्स आणि पोस्टही नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Helicopter Crash: धक्कादायक! बद्रीनाथहून परतणारे हेलिकॉप्टर कोसळले; पायलटसह ६ जणांचा मृत्यू

अर्शदीप सिंगचा वर्ल्ड रेकॉर्ड! IND vs NZ 4th T20I मध्ये फिलिप्सनेही नोंदवले एकापेक्षा एक सरस विक्रम

WhatsApp मध्ये मोठा बदल! आता प्रोफाइलला लावता येणार Cover Photo; मिळणार Facebook सारखा लूक

Marathi News Live Updates : बेस्ट कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट; ३ नोव्हेंबरला मिळणार बोनस

'ये सिर्फ कपड़ा नहीं, अभिमान है'; श्रद्धा कपूरच्या 'ईठा'चा ट्रेलर प्रदर्शित, विठाबाईंच्या भूमिकेतील लूक पाहून चाहते थक्क!

SCROLL FOR NEXT