Saif Ali Khan posing for paparazzi with wife Kareena Kapoor and sons Taimur and Jehangir Ali Khan. Google
मनोरंजन

करिनानं सोशल मीडियावर नवरा सैफ अली खानची केली कानउघडणी; कारणही तसंच

करिनानं सैफचा एक फोटो पोस्ट करीत पापाराझीला फोटोपोझ नं देण्यामागे समोरच्याला कमी लेखणं या त्याच्यातल्या गुणावर बोट ठेवलं.

प्रणाली मोरे

सैफ अली खान(Saif ali khan) आणि करिना कपूर(Kareena Kapoor) बॉलीवूडच्या प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक जोडपं आहे. त्यामुळे अर्थातच हे दोघे एकत्र दिसले की मीडियाचे कॅमेरे यांच्यावर हमखास रोखले जातात. तैमूर अली खान आणि जेह अली खान या त्यांच्या दोन मुलांचेही त्यांच्याइतकंच फॅन फॉलॉइंग आहे बरं का. पण असं असलं तरी एक गोष्ट लक्षात आलीय ती म्हणजे यांच्या कुटुंबात मम्मा आणि मुलं फोटो पोझ देण्यासाठी उत्सुक असली तरी पप्पा सैफ मात्र नेहमीच याबाबतीत निरुत्साह दाखवतात.करिनानेच काही दिवसांपूर्वी सैफचा एक फोटो पोस्ट करीत सांगितले होते की,''सैफला फोटोसाठी पोझ देणं आवडत नाही. कारण त्याला समोरच्याला कसं कमी लेखायचं हे उत्तम कळतं''. पण पुढे विनोदानं म्हटल्याचं तिनं सांगून टाकलं. नाहीतर उगाचच सोशल मीडियावर पत्रकारांना,मीडिया फोटोग्राफर्सला सैफ कमी लेखतो याची उलट-सुलट चर्चा रंगली असती.

करिनानं हॅलो मॅगझीनमधील सैफचा एक प्रोफाईल फोटो काही दिवसांपूर्वी शेअर केला होता. तिनं लिहिलं होतं,''पतौडी खानदानचा नवाब,शर्मिला टागोर आणि नवाब मन्सूर अली खान पतौडी यांचा मुलगा,कुठल्याही भूमिकेला चपखल निभावणारा अभिनेता.आता कळलं असेल तुम्हाला या फोटोत त्याचा रुबाब पाहून की मी आणि माझी मुलं फोटोपोझ देण्यासाठी उभे राहिलो तरी सैफ का नाही उभा राहत. त्याला समोरच्याला कमी लेखून पुढे जायचं चांगलं जमतं'' तिनं दोन रेड हार्ट इमोजी देखील पोस्ट केले होते. सैफनं आपल्या कुटुंबावर मीडियाचा कसा परिणाम होतो याविषयी आपली मतं काही दिवसांपूर्वी मांडली होती. त्याचं चौथं अपत्य जेहचा जन्म झाला तेव्हा तो म्हणाला होता की,''फोटोग्राफर्स त्यांचे काम करतात हे मला माहित आहे. त्यामुळे मी तैमूरला नेहमी सांगतो की नीट आदरानं उभा रहा,शिस्त बाळगा. आता तैमूरलाही ते कळाले आहे. तो देखील मग कॅमेरा पाहिला की हसतो,हात वर करतो.त्याला कॅमेराचे फ्लॅश आवडतात. पण हे तो केवळ पाहतो म्हणून सवयीचा भाग असल्यानं करतो. त्याला याविषयी नेमकं काय ते माहितच नाही अजून''. असो,पण अशी पोस्ट करुन करिनानं मात्र सोशल मीडियावर आपल्या नवऱ्यालाच नकळत सुनावलं आहे. कारण करिना नेहमीच फोटोपोझसाठी उत्सुक असते पण अनेकदा सैफमुळे तिला आपल्या उत्साहावर पाणी सोडावं लागतं हे दिसून आलं आहे.

Kareena Kapoor jokes about Saif Ali Khans aversion to paparazzi on Instagram Stories.

सैफ अली खान 'विक्रम वेधा' मध्ये लवकरच दिसणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत राधिका आपटे,रोहित सराफ महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ३० सप्टेंबरला हा सिनेमा आपल्या भेटीस येत आहे. तर करिना कपूर आमिर खान सोबत 'लाल सिंग चड्ढा' मध्ये दिसणार आहे. करिनानं नुकतेच डिजिटल विश्वातही पदार्पण केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

IND vs ENG 2nd Test: W,W,W,W,W! मोहम्मद सिराज ऑन फायर, बेन स्टोक्स गांगरला; इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला

ती खूपच बारीक, काळी-सावळी... प्रियांका चोप्राला पहिल्यांदा पाहिल्यावर थक्क झालेली मराठी अभिनेत्री; म्हणाली- ती हिरोईन बनायला आलेली...

FASTag Annual Pass: FASTag वार्षिक पास घ्यायचा विचार करताय? मग घेण्यापूर्वी 'हे' 11 महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची सविस्तर उत्तरं जरूर वाचा!

Magnesium & Vitamin D Deficiency: व्हिटॅमिन-D ची पातळी कमी होण्यामागे असू शकतो 'या' खनिजांचा अभाव, 'हे' अन्नपदार्थ ठरतील उपयुक्त

SCROLL FOR NEXT