Kargil Vijay Diwas 2024  Esakal
मनोरंजन

Kargil Vijay Diwas 2023: 'या' चित्रपटाने तुम्हाला होईल कारगिलच्या खऱ्या हिरोंची आठवण!

Vaishali Patil

Kargil Vijay Diwas 2024 Films Based On Kargil War:

आज सर्वत्र कारगिल विजय दिवस हा साजरा केला जात आहे. 25 वर्षांपूर्वी 26 जुलै 1999 रोजी भारतीय जवानांनी आपल्या शौर्य आणि धाडसाने कारगिल युद्धात पाकिस्तानचा पराभव केला. पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात असलेली कारगिलची ठिकाणांवर भारताचा झेंडा रोवला.

मात्र ही लढाई सोपी नव्हती. या युद्धात 500 हून अधिक भारतीय जवानांनी देशासाठी बलिदान दिले होते. कारगिल विजय दिवस लोकांना समजावा यासाठी चित्रपटसृष्टीत अनेक उत्कृष्ट चित्रपट बनविले गेले आहेत. ज्यांना प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला.

कारगिल युद्धावर अनेक चित्रपट बनले आहेत, जे पाहून तुमचे डोळे पाणावतील. स्वातंत्र्यसैनिकांवर आधारित बॉलीवूड चित्रपटांची यादी खुप मोठी आहे. आज तुम्ही घरबसल्या हे सिनेमे पाहू शकतात.

मौसम -

'मौसम' या चित्रपटात शाहिद कपूर आणि सोनम कपूर मुख्य भूमिकेत होते. शाहिदचे वडील पंकज कपूर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.या चित्रपटात कारगिल युद्धाव्यतिरिक्त मुंबई बॉम्बस्फोटाचेही काही सीन दाखवण्यात आले आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई करु शकला नाही. मात्र प्रेक्षकांनी या चित्रपटाला चांगला प्रतिसाद दिला. हा चित्रपट यूट्यूबवर पाहता येईल.

Tango Charlie-

अजय देवगणची मुख्य भुमिका असलेला टँगो चार्ली हा सिनेमा देखील कारगिल युद्धावर आधारित आहे. अजय देवगणसोबत या सिनेमात बॉबी देओल, संजय दत्त, सुनील शेट्टी, नंदना सेन, तनिषा यांच्याही प्रमुख भूमिका होत्या. हा चित्रपट यूट्यूबवर तुम्हाला पाहता येईल.

लक्ष्य -

2004 साली प्रदर्शित झालेला 'लक्ष्य' हा चित्रपट फरहान अख्तरने दिग्दर्शित केला होता. या चित्रपटात हृतिक रोशन आणि प्रीती झिंटा मुख्य भूमिकेत होते. कारगिल युद्धाचे अनेक प्रसंग तुम्हाला या चित्रपटात दिसतील. Netflix वर हा चित्रपट तुम्हाला दिसेल.

गुंजन सक्सेना -

जान्हवी कपूर चा 'गुंजन सक्सेना' हा चित्रपट देखील तुम्हाला कारगिल युदधाच्या काळात घेवुन जातो. पहिल्या महिला पायलट गुंजन सक्सेना यांची कहाणी तुम्हाला या चित्रपटात दिसेल. गुंजन सक्सेना या युद्धातील पहिल्या महिला वैमानिकांपैकी एक आहेत. शरण शर्मा दिग्दर्शित या चित्रपटात जान्हवी कपूर सोबत पंकज त्रिपाठी आणि अंगद बेदी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 'गुंजन सक्सेना' नेटफ्लिक्सवर पाहता येइल.

शेरशाह -

शेरशाह हा सुपरहिट सिनेमा शहीद कॅप्टन विक्रम बत्रा यांचा बायोपिक आहे. हा चित्रपट कारगिल युद्धावरच आधारित आहे. या युद्धातच कॅप्टन विक्रम बत्रां शहिद झाले होते. यात सिद्धार्थ मल्होत्रा, कियारा अडवाणी आणि शिव पंडित यांच्या प्रमुख भूमिका आहेत. प्राइम व्हिडिओवर हा सिनेमा पाहता येइल.

एलओसी कारगिल -

2003 मध्ये प्रदर्शित झालेला LOC या चित्रपटात अजय देवगण, संजय दत्त, अभिषेक बच्चन, सैफ अली खान, सुनील शेट्टी यांसारखे मोठे बॉलिवूड कलाकार दिसले होते. प्राइम व्हिडिओवर हा सिनेमा पाहता येइल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi NIA Custody : अनमोल बिश्नोईला ११ दिवसांच्या NIA कोठडी!, पटियाला हाऊस कोर्टाचा निर्णय

Pakistan Involvement in Red Fort Blast : अखेर पाकिस्तानचा खोटेपणाचा बुरखा फाटलाच! दिल्ली स्फोटातील सहभागाची नेत्यानेच दिली कबूली

Petrol Pump : पेट्रोल पंप संध्याकाळी सातनंतर बंद करण्याचा निर्णय मागे; पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनचा निर्णय

Mundhwa Land Case : मुंढवा जमीन प्रकरणात शीतल तेजवानींचा जबाब नोंदविला

Pravin Darekar : सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाला गती; सहकाराला आधुनिकतेची जोड द्यावी

SCROLL FOR NEXT