Kartik Aaryan Car  esakal
मनोरंजन

Kartik Aaryan Car : 'शहजादा असशील घरी, दंड भर गाडी घेऊन जा!' कार्तिकवर कारवाई

बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता कार्तिक आर्यन हा त्याच्या हटके स्टाईल आणि स्वॅगसाठी ओळखला जाणारा अभिनेता आहे. आता सध्या तो त्याच्या शहजाहा चित्रपटामुळे चर्चेत आला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Kartik Aaryan Car : बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता कार्तिक आर्यन हा त्याच्या हटके स्टाईल आणि स्वॅगसाठी ओळखला जाणारा अभिनेता आहे. आता सध्या तो त्याच्या शहजाहा चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. प्रेक्षकांनी मोठ्या संख्येनं त्याचा चित्रपट पाहायला जावं यासाठी कार्तिक प्रमोशनमध्ये व्यस्त असल्याचे दिसून आले आहे.

यासगळ्यात कार्तिक मुंबईतील सिद्धिविनायकचे दर्शन घेण्यासाठी गेला होता. मात्र तिथं त्यानं त्याची कार नो पार्किंगमध्ये पार्क केल्यानं त्याला मोठा झटका बसल्याचे दिसून आले आहे. त्यानंतर त्याला वाहतूक पोलिसांच्या कारवाईला सामोरं जावं लागलं आहे. त्याची सोशल मीडियावर चर्चाही सुरु झाली आहे. नेटकऱ्यांनी देखील त्याला दिलेल्या कमेंट्स भन्नाट आहे.

Also Read - स्टाॅक मार्केटमधलं ट्रेडर बनायचंय..मग ही पथ्यं पाळाच...

मंदिरात पोहचल्यानंतर कार्तिकनं नो पार्किंग झोनमध्ये कार उभी केली होती.त्यामुळे वाहतूकीस अडथळा होत असल्याचे दिसून आले. यानंतर वाहतूक पोलिसांच्या वतीनं त्याच्यावर कारवाईही करण्यात आली. आता वाहतूक पोलिसांकडून दंड ठोठावण्यात आला आहे. कारवाई करेपर्यत पोलिसांना माहिती नव्हते की ते वाहन कार्तिक आर्यनचे होते. कार्तिकच्या त्या अलिशान कारवर दंड ठोठावण्यात आला आहे.

खरंतर कार्तिक आर्यन नव्हे तर त्याचा चालक कार चालवत होता. त्यानं ती कार नो पार्किंगमध्ये पार्क केल्याचे दिसून आले. कार्तिकचे काही फोटोही यावेळी सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यावरील नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. त्यापैकी एकानं तर तू असशील शहजादा.पण आता पैसे भर असे नेटकऱ्यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SL vs AUS : पथूम निसंका पहिला शतकवीर! श्रीलंका Super 8s मध्ये, ऑस्ट्रेलियाचे नशीब 'आयर्लंड'च्या हाती; जाणून घ्या समीकरण

Surya Grahan 2026: वर्षातील पहिले सूर्यग्रहण 'या' 3 राशींसाठी ठरु शकते धोकादायक, 'हे' उपाय करा नाहीतर होईल मोठी हानी!

Muhammad Yunus Resigns : मुहम्मद युनूस यांनी बांगलादेशच्या अंतरिम सरकारच्या मुख्य सल्लागारपदाचा दिला राजीनामा!

Mani Shankar Aiyar : ‘’मी गांधीवादी, नेहरूवादी, राजीववादी आहे, पण राहुलवादी नाही’’ ; काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर थेटच बोलले..!

Pune Shivjayanti : रस्त्याच्या कामामुळे शिवजयंती मिरवणूक मार्गात बदल; महापौरांचे आदेश

SCROLL FOR NEXT