Dharma Production Announces Film With Kartik Aaryan  Essakal
मनोरंजन

Kartik Aaryan: वाद मिटला! करण जोहरने दिलं कार्तिकला वाढदिवसाचं गिफ्ट, धर्मा प्रोडक्शनने केली मोठी घोषणा

Vaishali Patil

Dharma Production Announces Film With Kartik Aaryan: बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन आज त्याचा 33 वा वाढदिवस साजरा करत आहे. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त कार्तिकच्या चाहत्यांनी त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. तर या खास दिवशी कार्तिकला धर्मा प्रोडक्शनकडून एक गिफ्ट मिळालं आहे.

गेल्या काही दिवसांपासून कार्तिक आर्यन आणि करण जोहर यांच्यातील वादाबाबत बऱ्याच चर्चा सुरु होत्या. अखेर कार्तिकने करण जोहरसोबत मैत्री केली आहे. आता कार्तिक आर्यन आणि करण जोहर एकत्र चित्रपट करणार आहेत.

कार्तिकने सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे याची घोषणा केली आहे. तर कार्तिकच्या वाढदिवसानिमित्त करणने या चित्रपटाची घोषणा केली, ज्यात त्याच्यासोबत एकता कपूर देखील काम करणार आहे. धर्मा प्रॉडक्शनने सोशल मीडियावर ही पोस्ट केली आहे

करणच्या धर्मा प्रोडक्शनने X वर केलेल्या पोस्टमध्ये सांगितले की, 'लाइट्स, कॅमेरा आणि सरप्राईज. धर्मा प्रॉडक्शन आणि बालाजी टेलिफिल्म्स सोबत एकत्र आलेल्या एका नवीन कथेची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे.

कार्तिक आर्यन अभिनीत आणि संदीप मोदी दिग्दर्शित या चित्रपटाचे नाव समोर आलेले नाही. हा चित्रपट 15 ऑगस्ट 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे. या पोस्टनंतर करण जोहरने देखील कार्तिक आर्यनला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे.

कार्तिक आर्यन आणि करण जोहरमधील वाद काय?

2021 मध्ये करण जोहर आणि कार्तिक आर्यन यांच्यात वाद झाल्याचे बोलले जाते. दोस्ताना 2 या चित्रपटामुळे दोघांमध्ये वाद झाला होता. त्यावेळी करणने कार्तिक आर्यनवर अनप्रोफेशनल असल्याचा आरोपही केला होता.

चित्रपटासाठी कार्तिक आर्यन जास्त पैसे मागत असल्याचे बोलले जात होते. मात्र कार्तिकने हे आरोप फेटाळले होते. त्यामुळे आता पुन्हा कार्तिक आणि करण एकत्र येणार असल्याने चाहते या प्रोजेक्टबद्दल उत्सुक आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : विजय मेळाव्यासाठी जोशात निघाले शिवसैनिक आणि मनसैनिक, कोळी बँडच्या तालावर मुंबई थरारली!

मुंबईत हिंदीत बोलणार, औकात असेल तर हात लावून दाखवा; स्वामी आनंद स्वरुप यांचं ठाकरे बंधूंना आव्हान

ENG vs IND: १ बॉल ६ धावा अन् भारताची कर्णधार आऊट; इंग्लंडचा भारतावर शेवटच्या चेंडूवर विजय

Kondhwa Case कुरिअर बॉय बनून नेहमी फ्लॅटवर यायचा, शरीरसंबंधावरून बिनसलं अन् तरुणीने पोलीस ठाणं गाठलं; तरुणाला माहितीच नाही आपण....

'या' चित्रपटाआधी भारतात नव्हतं संतोषी माताचं मंदिर, सिनेमा आला अन् सुरु झाले व्रत-उपास! चित्रपट पाहण्यासाठी चप्पल काढून जायचे प्रेक्षक

SCROLL FOR NEXT