Kartik Aaryan Unveils His New Look From Chandu Champion esakal
मनोरंजन

Kartik Aryan : कार्तिक आर्यनचा 'चंदु चॅम्पियन' मधील नवा लूक पाहिलाय? नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया!

बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता कार्तिक आर्यननं त्याच्या आगामी चंदु चॅम्पियन नावाच्या चित्रपटाचा वेगळा लूक पुन्हा एकदा सोशल मीडियावर शेयर केले आहे.

युगंधर ताजणे, सकाळ ऑनलाईन टीम

Kartik Aaryan Unveils His New Look From Chandu Champion : बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता कार्तिक आर्यननं त्याच्या आगामी चंदु चॅम्पियन नावाच्या चित्रपटाचा वेगळा लूक पुन्हा एकदा सोशल मीडियावर शेयर केले आहे. त्याची चर्चा सुरु झाली आहे. नेटकऱ्यांनी त्या लूकवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. भारतीय मातीतला चंदु चॅम्पियन हा प्रत्येक भारतीयाच्या रक्तात चॅम्पियन होण्याची क्षमता असल्याचे कार्तिकनं म्हटले आहे.

कार्तिकचा यंदाच्या वर्षातील पहिला चित्रपट चंदु चॅम्पियन हा या वर्षी जूनमध्ये प्रदर्शित होणार आहे. जुनच्या दुसऱ्या आठवड्यात १४ तारखेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चंदु चॅम्पियनचं दिग्दर्शन कबीर खाननं केलं आहे. हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे. त्यात कार्तिकनं चंदूची भूमिता साकारली आहे.

काही दिवसांपूर्वी कार्तिकनं त्याच्या जन्मदिनाच्या निमित्तानं करण जोहरसोबतच्या नव्या प्रोजेक्टची घोषणा केली होती. त्यानंतर आता तो संदीप मोदी याच्या सोबत कार्तिक वेगळ्या सिनेमात दिसणार आहे. त्याचा तो चित्रपट १५ ऑगस्ट २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन आणि एकता कपूरच्या बालाजी टेलिफिल्म्सच्या वतीनं प्रदर्शित केला जाणार आहे.

इंस्टावर कार्तिकनं त्याच्या नव्या चित्रपटातील लूकचा फोटो शेयर करताना त्यानं म्हटलं आहे की, भारतीय इतिहासातील त्या दुर्मिळ आणि अद्भुत गोष्टीचा साक्षीदार होण्याची संधी मिळतेय ही खूप मोठी गोष्ट आहे. मला नव्या चित्रपटातून त्या गोष्टीचा भाग होता येणार आहे याचेही समाधान आहे. संदीप मोदी यांच्यासोबत या नवीन प्रवासासाठी मी खूपच उत्सुक आहे. असेही कार्तिक आर्यननं म्हटले आहे.

कार्तिकच्या प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास तो प्रसिद्ध दिग्दर्शक हंसल मेहता यांच्या कॅप्टन इंडियामध्ये दिसणार आहे. त्यानंतर तो अनुराग बसू यांच्या आशिकी ३ मध्ये एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. यापूर्वी कार्तिकी आर्यनच्या भुलभलैय्या २ आणि सत्यप्रेम की कथा चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. आगामी काळात तो भुलभुलैय्या ३ मध्ये तो दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT