Kartik Aaryan & Salman Khan Instagram
मनोरंजन

Kartik Aaryan: 'बहुत दुखनेवाला है..', जेव्हा सलमाननं कार्तिकला दिलेली वॉर्निंग; वाचा किस्सा..

'शहजादा' सिनेमाच्या प्रमोशन निमित्तानं एका मुलाखतीत कार्तिक आर्यननं दबंग खानविषयी एक मोठा खुलासा केला आहे.

प्रणाली मोरे

Salman Khan warned Kartik Aaryan: कार्तिक आर्यन सलमान खानच्या 'कॅरेक्टर ढीला है' या गाण्याच्या रीमेकवर नाचला अन् अनेकांच्या भूवया उंचावल्या. अर्थात त्याला नावं ठेवण्याच्या हेतूनं. पण दबंग खाननं मात्र 'शहजादा' च्या अभिनेत्याला भरपूर पाठिंबा दिला.

त्यावेळी कार्तिक भलताच खूश झाला,जेव्हा सलमाननं कार्तिकच्या 'कॅरेक्टर ढीला २.०' या गाण्याला शेअर केलं. पण सलमान खाननं कार्तिक आर्यनच्या या गाण्यातील स्टेपविषयी त्याला वॉर्निंग दिली होती. कार्तिकनं नुकत्याच एका मुलाखतीत याचा खुलासा केला आहे.

कार्तिक आर्यनचं 'कॅरेक्टर ढीला २.०' या गाण्याला त्याच्या चाहत्यांचा जबरदस्त रिस्पॉन्स मिळत आहे. कार्तिक आर्यनच्या गाण्यातील डान्स स्टेप्सची खूपच प्रशंसा होताना दिसत आहे. अगदी त्या डान्स स्टेप्सच्या देखील चाहते प्रेमात पडताना दिसत आहेत,जिला करताना दस्तुरखुद्द सलमान खानची अवस्था खूपच बिकट झाली होती.

सलमाननं या संदर्भात म्हणूनच कार्तिकला देखील इशारा दिला होता. (Kartik aaryan reveals salman khan had warned him about a dance step character dheela song)

कार्तिकच्या 'शहजादा' सिनेमात सलमान खानच्या 'रेडी' सिनेमातील 'कॅरेक्टर ढीला..' गाण्याचं रीमेक करताना बऱ्याच अंशी अगदी त्याच अंदाजात काही स्टेप्स सामिल केल्या आहे. तसंच कार्तिकच्या या गाण्यातील नव्या अंदाजानंही लक्ष वेधलं आहे.

कार्तिक आर्यनला सलमाननं पाठिंबा दिलाच होता पण गाण्याच्या शूटिंग आधी इशारा देखील दिला होता. कार्तिक म्हणाला, ''जेव्हा हे गाणं शूट करण्याची संधी मला मिळाली तेव्हा केवळ माझ्यासाठीच नाही तर आमच्या पूर्ण टीमसाठी तो आंदाचा क्षण होता. सलमान खाननं आम्हाला या गाण्यासाठी खूप सपोर्ट केला.आता हे गाणं खूप फेमस झालंय..जिथे प्रमोशनसाठी जात आहोत तिथे चांगला रिस्पॉन्स मिळतोय. यासाठी मी सलमान खान यांचे आभार मानीन''.

''त्या गाण्यात खाली बसून एक स्टेप आहे,ज्यात मी खाली बसून मागे मागे जातो..त्यावेळी त्यांनी त्या स्टेपसाठी म्हटलं होतं...'बहुत दुखनेवाला है..' आणि ते जे काही म्हणाले होते ते खास आपल्या स्टाइलमध्ये''.

सलमाननं कार्तिकचं हे गाणं त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलं होतं. तसंच, रोहित धवन आणि कार्तिक आर्यनला टॅग करत शुभेच्छा दिल्या होत्या. तेव्हा कार्तिकला आकाश ठेंगणं झालं होतं.

मग कार्तिकनं देखील कमेंट करत लिहिलं होतं की,''सबका भाई सबकी जान,शहजादाचं तू स्वागत केलंस यासाठी धन्यवाद. सपोर्टसाठी थॅंक्यू सर..ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे''.

रोहित धवन दिग्दर्शित 'शहजादा' १७ फेब्रुवारी रोजी रिलीज होत आहे. अल्लू अर्जूनचा तेलुगू सिनेमा 'Ala Vaikunthapurramuloo' चा हा हिंदी रीमेक आहे.

सुरुवातीला हा सिनेमा १० फेब्रुवारी रोजी रिलीज होणार होता,पण शाहरुखच्या 'पठाण' सिनेमाचा सुरु असलेला धमाका पाहता निर्मात्यांनी 'शहजादा'चं रिलीज १७ फेब्रुवारी पर्यंत पुढे ढकललं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akhilesh Yadav VIDEO : "दिवे अन् मेणबत्त्यांवर पैसा का खर्च करायचा?, ‘ख्रिसमस’ मधून शिका" ; अयोध्या दीपोत्सवाच्या पूर्वसंध्येस अखिलेश यादव यांचं वादग्रस्त विधान!

Bus Accident :भीषण अपघात! चालकाचे नियंत्रण सुटले अन् बस खडकावर आदळली, १५ जणांचा मृत्यू

Air India flight malfunction : 'एअर इंडिया'च्या विमानात बिघाड; सणासाठी निघालेले २५५ भारतीय अडकले परदेशात!

AUS vs IND: ऑस्ट्रेलियाचा प्लॅन झाला! भारताचा सामना करण्यासाठी पहिल्या वनडेसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन नव्या खेळाडूंना संधी

Boat Capsizes: दुर्दैवी! १४ भारतीय नागरिकांना घेऊन जाणारी बोट उलटली, ३ जणांचा मृत्यू, तर...; घटनेनं हळहळ

SCROLL FOR NEXT