kartik imtiaz 
मनोरंजन

'इम्तियाज दिग्दर्शक नव्हे तर जादुगारच', कार्तिकने इम्तियाजसाठी लिहिलेलं खास पत्र वाचलं का....

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : बॉलीवूड अभिनेता कार्तिक आर्यन बॉलीवूडमध्ये यशाची शिखरे गाठत आहे. 'प्यार का पंचनामा' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा कार्तिक आता तरुणींच्या गळ्यातील ताईत बनला आहे. 'सोनू के टिटू की स्वीटी', 'लुका छुपी' सारखे सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर त्याची फॅन फॉलोईंग चांगलीच वाढली आहे. कार्तिकचा हा प्रवास सोपा नव्हता. अलिकडेच त्याचा अभिनेत्री सारा अली खान सोबतचा लव्ह आजकाल चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे दिगदर्शक इम्तियाज अली हे त्याचे आवडते दिगदर्शक आहेत. अशातच कार्तिकने इम्तियाज अली सोबत काम करण्याचा त्याचा अनुभव शेअर करत आणि त्यांचे आभार मानत एक भावनिक पत्र लिहिले आहे. 

'लव्ह आजकाल 2' चित्रपटाच्या सेटवरील एक सुंदर फोटो शेअर करत त्याने लिहिले आहे की, 'जेव्हा आपण पहिल्यांदाच चित्रपटांकडे वळण्याचा आणि अभिनेता बनण्याचे स्वप्न पाहतो तेव्हा आपण एका आरशासमोर अभिनय करण्याचा प्रयत्न करतो आणि प्रत्येक वेळी ते चांगले करतो. आणि तेव्हा चित्रपटसृष्टी आपल्याला जादूई वाटू लागते. मग तुम्हाला एक चित्रपट मिळेल. तुम्ही कॅमेर्‍याकडे पाहता. हा कॅमेरा तुम्ही मुंबईत घेऊन आलेल्या सुटकेसपेक्षा ही मोठा आहे. ती ब्राईट लाईट जणू आपण प्रत्येकाचा वेळ वाया घालवण्याने आपल्याला ओरडत आहे. काही वर्षे नर्व्हस न दिसण्याच्या प्रयत्नात निघून जातात. मग तुम्हाला एक इम्तियाज अलीचा चित्रपट मिळतो. ज्या क्षणी त्यांनी चित्रपटाची कथा सांगितली, आपण एक स्वप्न पाहत असल्याचा भास होऊ लागतो.

मला तर हेसुद्धा आठवत नाही की ते सेटवर कॅमेरा कधी पाहायचे. कट म्हंटल्यानंतर मी नेहमी त्यांना उभे असलेलं पाहिलं आहे. ते मॉनिटर जवळ कधीच नसायचे. ते नेहमी माझ्या आजूबाजूला असायचे.'कार्तिक पुढे म्हणाला,' लव्ह आजकाल मधील माझ्या परफॉर्मन्ससाठी माझी कधीही कोणीही एवढी प्रशंसा केली नव्हती, ती त्यांनी केली. तेही मी चित्रपटसृष्टीतील ज्या व्यक्तीचा जास्त आदर करतो आणि माझ्या आवडत्या दिग्दर्शकाकडून मिळाल्याने मी खूप आनंदी आहे.

आणि म्हणूनच मला या चित्रपटात काम करणं फार सोपं होत. मी घाबरलो होतो की मला एकच चित्रपटात दोन भूमिका साकरायच्या आहेत. आणि ते चित्रपटात खूप सोप्यापद्धतीने झाले. एक अभिनेता म्हणून आरश्यासमोर उभ राहून अभिनय करण्यासाठी कोणतीही कर्फ्मटेबल जागा नाही. इम्तियाज अली तुम्हाला तिकडेच घेऊन जातात. आणि यामुळेच इम्तियाज अलीच्या चित्रपटातील मोठ्या कलाकारांचे परफॉर्मन्स देखील खूप चांगले होतात.

इम्तियाज अली दिग्दर्शक नाहीयेत तर जादूगार आहेत. मला माझ्या आयुष्यातील बेस्ट परफॉर्मन्स केल्याबद्दल सर तुमचे खूप धन्यवाद.' अशी ही भावनिक पोस्ट शेअर करत त्याने त्याच्या इम्तियाज आलीबद्दल प्रेम व्यक्त केलं.

kartik aaryan says he gave best performance of my career in love aaj kal calls imtiaz ali a magician

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025: हाच तो क्षण! हरमनप्रीतने टीम इंडियासह उंचावली ट्रॉफी; सेलिब्रेशन अन् स्वप्नपूर्तीचे क्षण, पाहा Video अन् Photo

World Cup 2025: शाब्बास मुलींनो! विराट कोहली, सचिन तेंडुलकरपासून नीरज चोप्रापर्यंत विश्वविजेत्या भारतीय संघावर शुभेच्छांचा वर्षाव

ICC Announced Prize for India : वर्ल्ड कप विजयाची ट्रॉफी अन् कोट्यवधीचं बक्षीस! भारतीय महिला क्रिकेटपटूंसाठी आयसीसीची मोठी घोषणा...

Amol Muzumdar: भारतासाठी खेळण्याची संधी मिळाली नाही, पण आता World Cup विजेता कोच; महिला संघाच्या यशामागचा हिरो

India won Women’s World Cup: दीप्ती शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड! भारतीय महिलांनी इतिहास रचला, रोहित शर्मा रडला; Video Viral

SCROLL FOR NEXT